शिवाजी पवळ शहर प्रतिनिधी श्रीगोंदा
(प्रतिनिधी) रयत शिक्षण संस्थेच्या महाराजा जिवाजीराव शिंदे महाविद्यालयात मराठी विभाग, ग्रंथालय विभाग व सांस्कृतिक विभाग यांनी वाचन प्रेरणा दिनाच्या निमित्ताने वेगवेगळे उपक्रम घेतले. ग्रंथालय विभागाच्यावतीने प्रा. देवेंद्र बहिरम यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. ते म्हणाले की, डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांनी अवकाश संशोधन व भारतीय सुरक्षा यावर त्यांनी मोलाचे काम केले आहे. डॉ.ए.पी.जे. अब्दुल यांच्यासारख्या शास्त्रज्ञांमुळेच विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात भारत अव्वल स्थानावर गेला आहे. अब्दुल कलामांनी विज्ञानाला अध्यात्माची जोड दिली. असे प्रतिपादन त्यांनी केले. अध्यक्षस्थानी प्रभारी प्राचार्य प्रो.डॉ. महादेव जरे होते. ते म्हणाले की, विद्यार्थ्यांनी वाचन प्रेरणा दिनाच्या निमित्ताने प्रेरणा घेऊन वाचन करावे. आपल्या व्यक्तिमत्त्वाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी वाचन फार महत्त्वाचे आहे.मराठी व सांस्कृतिक विभागाच्यावतीने प्रकट वाचनाचा कार्यक्रम घेण्यात आला. प्रास्ताविक मराठी विभाग प्रमुख प्रो.डॉ. राजेंद्र ठाकरे यांनी केले. डॉ. एपी.जे. अब्दुल कलाम यांच्या ,”अग्निपंख” या ग्रंथाचे प्रकट वाचन विद्यार्थ्यांनी केले. ग्रंथालय विभागाने ग्रंथ प्रदर्शनाचे आयोजन केले होते. विद्यार्थ्यांनी वाचनाचा आनंद घेतला. या समारंभाला उपप्राचार्य डॉ. प्रकाश साळवे, ज्युनियर विभागाचे उपप्राचार्य प्रा. शहाजी मखरे, डॉ. नितीन थोरात, डॉ. सुदाम भुजबळ, डॉ. राजाराम कानडे, अधीक्षक बाळासाहेब राऊत, डॉ. राहुल गायकवाड, प्रा.श्रीकांत थोरात, प्रा. प्रतिमा शिंदे, श्री रघुनाथ लबडे, बहुसंख्य विद्यार्थी विद्यार्थिनी, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. सांस्कृतिक विभागाचे प्रमुख प्रा. अनंत सोनवणे यांनी सूत्रसंचालन केले. आभार ग्रंथपाल प्रा. यशोदा लबडे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ग्रंथालय विभागाने मोलाचे सहकार्य केले.








