शिवाजी शिंदे जिल्हा प्रतिनिधी परभणी
स्वामी गोविंददेव गिरीजी महाराज बनले श्रोते. सेलू : दि. 22 ऑक्टो.मोहिले माझे मन, हरी तुझ्या मुरलीने मन मोहिले माझे, यासह अनेक भक्तिमय भजन सादर करून, गोवत्स श्रीराधाकृष्णजी महाराज यांनी उपस्थितांची मने जिंकली. विशेष म्हणजे अयोध्या येथील श्रीराम जन्मभूमी न्यासचे कोषाध्यक्ष स्वामी गोविंददेवगिरीजी महाराज यांनी श्रोत्यात बसून संपूर्ण भजन संध्या चा रस श्रवण केला .श्रीराम कथेचे आयोजक जयप्रकाश बिहाणी यांनी कार्य क्रमाचे प्रास्ताविक केले. भजो भजो पांडुरंग, विठ्ठला, याभजनाने भजन संध्या ची सुरुवात झाली .तर पांडुरंग विठ्ठला, पंढरीनाथा विठ्ठला, विठ्ठल विठ्ठल विठ्ठला ,कधी येशील माझ्या घरा ,जब राम मेरे घर आयेंगे ,माझे सद्गुरु अंगणी आले ऐक गोविंदा विनवू कितींदा ,थंडगार पाणी, वाजते थंडी, वस्त्र दे रे गोविंदा ,दास रघुनाथ का सखा श्रीनाथ का ,कुछ इधर की रहा ,कुछ ऊधर की रहा,विठ्ठल माझा माझा मी विठ्ठलाचा असे अनेक भक्तिमय भजन सादर करून भाविकांनी ओसंडून गेलेल्या मंडपात, भाविकांचा आनंद देखील ओसंडून वाहताना दिसला. प्रत्येक भजनाच्या तालावर तरुणाई उभे राहून नृत्य करू लागली. यावेळी त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद देखील ओसंडून वाहताना दिसत होता.महाराज स्वामी गोविंददेवगिरीजी महाराज यांची इथे श्रीरामकथा सुरू आहे. महाराजांचे संपूर्ण सेलू नगरीवर प्रेम आहे. हे खूप मोलाचे आहे कारण संपूर्ण संसारा ची उपलब्ध एकीकडे आणि एका संताचे प्रेम एकीकडे असते. संतांची सोबत प्रत्यक्षात भगवंतांची अनुभूती देते. म्हणून सेलू नगरीतील एखादा व्यक्ती मुख्यमंत्री झाल्यानंतर जो आनंद सेलूकारांना मिळेल, त्याहीपेक्षा अधिक आनंद संतांची कृपा झाल्यानंतर मिळतो. ही सेलूकरांसाठी खूप मोठी गोष्ट आहे.म्हणून सेलूकर मंडळी भाग्य शाली असल्याचे प्रतिपादन गोवत्स श्रीराधाकृष्णजी महाराज यांनी केले आहे. गोवत्स बालकांची संघटना उभी केली .आपल्या देशाचे भाग्य आहे की, संतांच्या पंक्तीत बसून संता सारखे जीवन जगून दाखवून, केवळ गोमातेची सेवा करणे हेच ध्येय ठेवणारे श्रीराधाकृष्णजी महाराज यांनी गोवत्स बालकांची संघटना उभी केली आहे त्यामुळे हे अतिशय मोलाचे व मोठे काम ते करत आहेत. आज भजनसंध्या ची अनुभूती घेताना आपल्या सोबत नक्की कुठेतरी उभे राहून प्रत्यक्ष भगवान देखील या भजन संध्येचा रस ग्रहण करीत असतील कारण भक्त बसून गातात तेव्हा भगवान उभे राहून ते ऐकतात आणि जेव्हा भक्त उभे राहून गातात तेव्हा भगवान नृत्य करतात. त्यामुळे नक्कीच आजच्या इतक्या सुंदर भजनाचा रस भगवंतांनी देखील ग्रहन केले असेल कारण प्रभू वैकुंठात नसतात तर ज्या ठिकाणी सगळे भक्त रंगून जाऊन भगवंताच्या नावाचे स्मरण करतात. तिथे भगवंत असतात म्हणून आजच्या भजन संध्येचा रस आपल्या सर्वांसह भगवंतानी देखील इथे येऊन चाखला असेल,असे ही स्वामी गोविंददेव गिरीजी महाराज यांनी यावेळी बोलतांना स्पष्ट केले. एवढेच नव्हे तर नामदेव कीर्तन करी भुजे देव नाचे पांडुरंग हे भजन ह. भ. प. लक्ष्मीप्रसाद पटवारी यांना गायला सांगून भजन संध्यातील आनंद द्वीगुणीत केला. अं:र्तलिन होऊन केलेले नृत्य, कीर्तन, भजन हे साक्षात समाधी असते .एवढेच नव्हे तर वैकुंठात जाणे हे आनंददायी आहेच मात्र, त्याहीपेक्षा संत व भक्त, जेथे बसतील आणि असतील तेथे वैकुंठ निर्माण करणे हे विशेष आनंददायी असल्याचे स्वामी गोविंददेव गिरीजी महाराज म्हणाले.