आनंद मनवर जिल्हा प्रतिनिधी, रायगड
पाली : दि. 21 ऑक्टोबर सविस्तर माहिती अशी की गेली 4 ते 5 दिवसा पासून रायगड जिल्ह्यातील जवळ जवळ सर्वच तालुक्यात अवकाळी पाऊस संध्याकाळचा वेळात पडत असून त्या मुळे सर्व भातशेती पाण्याखाली गेली आहे. त्या मुळे शेतकऱ्यांना चिंता लागली आहे. त्या मुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. हाती आलेले या वर्षी भातपीक गेले आहे. सततचा पावसा मुळे सर्व भात शेती संकटात आली आहे.त्या मुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. तरीपावसाचा आस्मानी कहरा मुळे मोठ्या प्रमाणात भात शेतीचे नुकसान झाले असल्याने महसूल विभागाने पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई त्वरित मिळावी. तसेच शेतकऱ्यांना शासनानी दखल घेऊन नुकसान भरपाई द्यावी ही मागणी करत आहे.