रितेश टीलावत जिल्हा प्रतिनिधी अकोला
नुकत्याच झालेल्या निवडणुकीत कुणबी विकास मंडळ रजिस्ट्रर नंबर 584 च्या जिल्हा सहकोषध्यक्ष पदी हीवरखेड येथील माजी सरपंच संदीप इंगळे यांची अविरोध निवड करण्यात आली आहे. धर्मदाय आयुक्त यांच्या आदेशाने 18 सप्टेंबर ते 10 ऑक्टोंबर दरम्यान अकोट, तेल्हारा, बाळापूर, अकोला या चार तालुक्याच्या तालुका कार्यकारिणीची लोकशाही पद्धतीने निवड करण्यात आली तदनंतर या चारही तालुक्याच्या पदाधि काऱ्यांनी मतदानाद्वारे जिल्ह्याच्या कार्यकारिणीची निवड केली यामध्ये सह कोषाध्यक्ष पदासाठी विड्रोल नंतर संदीप इंगळे यांचा एकच अर्ज रहल्या मुळे त्यांना निवडून निर्णय अधिकारी रवींद्र गुल्हाने यांनी अविरोध घोषित केले तर उर्वरित पदांसाठी निवडणूक होऊन त्यामध्ये जिल्हाध्यक्ष म्हणून डॉ. बाबुराव शेळके, कार्याध्यक्ष पदी संजय बागळकर, सरचिटणीस पदी श्रीकांत ढगेकर , कोषाध्यक्ष पदी किशोर ठाकरे, उपाध्यक्ष पदी शिवदास गोंड, वासुदेव निंबोकार, विजय मोरे, सहचीटनिस पदी भास्कर पुराळे, अशोक बढे, श्रीधर मोरे, सहकोषाध्यक्ष पदी संदीप इंगळे अविरोध तर सदस्य पदी अँड नंदशोर शेळके, गणेश खुमकर, नरेंद्र घाटे, भारत ढगे, महादेव काळे, गजानन हागे, मनीष बहाकर, विवेक कोकाटे, विनायक काटे यांची बहुमताने नीवड करण्यात आली आहे, या निवडणुकी दरम्यान निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून रवींद्र गुल्हाने यांनी काम पाहले नवनियुक्त कार्यकारणीचे समाज बांधवांच्या वतीने स्वागत करण्यात आले .