अरविंद बेंडगा तालुका प्रतिनिधी, डहाणू
डहाणू :- पालघर जिल्ह्यात काही दिवसांपासून सुरू असलेल्या सततच्या पावसामुळे जिल्ह्यातील आठही तालुक्यांतील भात शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, भात पिके काढणीसाठी योग्य स्थितीत आली होती, मात्र अचानक सुरू झालेल्या पावसामुळे पिकांची नासाडी झाली आहे.आता या परिस्थितीत शेतकऱ्यांसमोर मोठे संकट उभे राहिले आहे, कारण पिकांच्या नुकसानीमुळे उत्पादन कमी होण्याची भीती निर्माण झाली आहे. पावसामुळे शेतांमध्ये पाणी साचल्याने भाताचा दर्जा खराब होण्याची शक्यता आहे, ज्यामुळे बाजारात मागणी आणि किमतीवरही परिणाम होऊ शकतो.शेतकऱ्यांनी सरकारकडून तातडीने मदतीची मागणी केली असून, पीक विमा आणि नुकसानभरपाई मिळावी अशी मागणी केलेली आहे.