मारोती बारासागडे तालुका प्रतिनिधी चामोर्शी
चामोर्शी- तालुक्यात गेल्या दोन दिवसांपासून परतीच्या पावसाने धुमाकूळ घालुन हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतला आहे.चामोर्शी तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात भात शेतीचे पिक घेतले जाते. दरवर्षी शेतकरी नव नवीन भाताचे वाण आणुन आपल्या शेतात लावतात.यंदा वेळेवर पाऊस सुरू झाला होता त्यामुळे सर्वांचे चांगले पिक आले होते.पण कापणीसाठी तयार झालेलं पिक परतीच्या पावसाने जमीनदोस्त करून सर्वच शेतकऱ्यांना धोका दिला आहे.महागडे बियाणे,खत, मजुरी, औषधे यासाठी लावलेला पैसा तसेच चांगलं आलेलं पिक वाया गेल्याने शेतकऱ्यांच्या कुटुंबांवर उपासमारीची वेळ आली आहे. ग्रामीण भागातील अनेक शेतकरी हे भात शेतीवरच अवलंबून असतात. दिवाळी सण येण्यापूर्वी भात कापणी करून आपल्याला लागेल तेवढे धान्य घरी ठेवून काही धान्य, पावली विकून त्या पैशातून दिवाळी सणाला कपडे, मिठाई, घरात लागणारे सामान खरेदी करतात व काही पैसे वाचवून मुलांच्या शिक्षणासाठी लावतात. यावर्षी सर्व शेतकऱ्यांची दिवाळी कडू होणार आहे. सर्व शेतकरी वर्गाला अपेक्षा होती की या वर्षी पीक चंगल होईल पण तसं काही झालं नाही त्यामुळे .शेतकरी वर्गाची प्रशासनाला विनंती आहे की त्यांनी लवकरात लवकर भात शेतीचे नुकसानीचे पंचनामे करून भरपाई द्यावी.