प्रशांत मुनेश्वर
शहर प्रतिनिधी नांदेड
नांदेड – विद्यार्थ्यांच्या विविध कलागुणांना वाव मिळावा, विद्यार्थ्यांमध्ये असलेल्या सुप्त क्षमता शक्ती यांना चालना मिळावी यासाठी व्यासपीठाची आवश्यकता असते, हाच उद्देश लक्षात ठेवून स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ अंतर्गत दरवर्षी अंतर महाविद्यालयीन युवक महोत्सव हा घेण्यात येतो. यंदाचा हा युवक महोत्सव संयोग सेवाभावी संस्था व स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ विष्णुपुरी नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक १८ ऑक्टोबर ते २१ ऑक्टोबर या कालावधीत घेण्यात येत आहे. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ अंतर्गत येणाऱ्या विविध जिल्ह्यातील ९९ महाविद्यालयांनी यामध्ये सहभाग नोंदविला व स्पर्धकांची एकूण संख्या ही १५१० असून विविध मन यांच्या माध्यमातून कलावंतांनी प्रेक्षकांची मने जिंकली. राजकारण या विषयावर विडंबनाच्या माध्यमातून सामाजिक वास्तविकता दाखविण्याचा प्रयत्न कलावंतांनी केला. विविध पोवाडे, देश पर भक्ती गीते परिपाठाच्या माध्यमातून संविधानिक मूल्य सामान्य दुरवण्याचा विद्यार्थ्यांचा प्रयत्न, तसेच विशेष आकर्षण ठरलेले पीपल्स महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी साकारलेली बाजीप्रभूंची शौर्यगाथा होय. अशी महाराष्ट्राची सांस्कृतिक विविधता दर्शविणारा हा युवक महोत्सव येणाऱ्या काळात देखील या नवकलावंतांना प्रोत्साहन देऊन एक यशस्वी कलाकार होण्यास सहाय्यक ठरेल यात शंका नाही .