नागोराव शिंदे
तालुका प्रतिनिधी हिमायतनगर
रविवार दि.२० ऑक्टोबरच्या दुपारी दोनच्या सुमारास पावसाला सुरुवात झाली. जवळपास अडीच ते तीन तास जोरदार पाऊस झाल्याने शेतातील सोयाबीन कपाशीची उभी पिकेपाण्याखाली गेली आहेत. परिणामी हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या दिवाळी सणाच्या तयारीला ब्रेक लागला असून त्यांची दिवाळी अंधारात जाण्याची शक्यता आहे. हिमायतनगर तालुक्यात दिवाळीला खरिपाचे धान्य घरात असून अतिवृष्टीमुळे पिकांची अपरिमित हानी झाली आहे.
हिमायतनगर तालुक्यात परतीच्या पावसाने थैमान घातले आहे.
त्यामुळे उभी पिके आडवी झाली आहे. दिवाळीपूर्वी खरीप पिकाची कापणी, मळणी करून धान्य घरात येते. मात्र या वर्षी परतीच्या पावसाचा धुमाकूळ सुरू असल्यामुळे यंदाच्या
प्रतिच्या पावसामुळे मोठे नुकसान झाले आहे. अस्मानी संकटाने बळीराजाचे कंबरडेच मोडले असून हिमायतनगर तालुक्यात परतीच्या पावसाचा जोरदार तडाखा बसला असल्याने महसूल विभागाने शेतकऱ्यांना पंचनामे करून मदत देऊन दिवाळी सण साजरा करावा अशी मागणी होत आहे








