संजय डोंगरे
ग्रामीण प्रतिनिधी माना
मुर्तीजापुर : तालुक्यातील माना पोलीस स्टेशन हद्दीतील कुरम येथील जंगलात पारधी वेड्यावर गावठी दारूच्या हातभट्टीवर धाड टाकत माना पोलिसांनी रसायन जागेवरच नष्ट केले. दिनांक १९ ऑक्टोबर शनिवार रोजी सकाळी आठ वाजताच्या सुमारास माना पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुरज सुरवसे पारधी वेड्यावर हातभट्टी दारू काढत असल्याची माहिती मिळाली असता पोलीस पथकासह धाड टाकण्यात आली. या कारवाईत सुमारे आठ हजार रुपये किमतीची गावठी दारू तयार करण्यासाठी लागणारे ४० लिटर रसायनाने भरलेले ड्रम तीनशे लिटर गावठी दारू किंमत तीस हजार रुपये. लोखंडी ड्रम,जळाऊ लाकडे, प्लास्टिकचे टोपले, असा एकूण ३८ हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जागेवर नष्ट केला. पोलिसांची चाहूल आरोपी जंगलाच्या दिशेने पळून गेला. मात्र पोलिसांनी त्याची ओळख पटवली असून आरोपीचे नाव बबलू पवन पवार ( ३५, रा. पारधी वेडा ) याच्या विरुद्ध दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई ठाणेदार सुरज सुरोशे, उपनिरीक्षक गणेश महाजन, राजेंद्र वानखडे दीपक सोळंके जयश्री मुंडे यांनी केली.








