गजानन डाबेराव ग्रामीण प्रतिनिधी नांदुरा
नांदुरा:- नांदुरा पोलीस कस्टडीत असलेला आरोपी कविन बाबु भोसले रा हलखेडा मुक्ताईनगर हा आरोपी पोलासांच्या हातावर तुरी देउन फरार दरोड्यातील आरोपी नांदुरा पोलिसांच्या तावडीतून फरार याबाबत समजलेले असे की नांदुरा पोलिसांनी निमगाव नारखेड रोड रोडवरील एका दरोडेच्या प्रकरणी अटक केलेला आरोपी आज रविवार दि.२०ऑक्टोबर २०२४ दुपारी१२ वाजण्याच्या सुमारास लघवीसाठी बाहेर काढले असता पोलिसाच्या हातून त्याने भिंतीवरून बाहेर उडी मारून पळून गेला. सदर आरोपीच्या तपासासाठी नांदुरा पोलीस स्टेशनचे सर्व पोलीस अधिकारी,कर्मचारी, ट्राफिक पोलीस ही सदर आरोपीला शोधण्यासाठी सर्वत्र शोध घेत आहेत.सदर दरोड्यातील आरोपीने ज्ञानगंगा नदी पात्रात उडी मारून भुईशिंगा या गावाकडे गेल्याचे पोलिसांना सांगितल्याचे आहे. सदर आरोपी कुणाला दिसून आल्यास त्यांनी नांदुरा पोलीस स्टेशन चे ठाणेदार विलास पाटील यांच्याशी ८८८८८४३७८८८ या मोबाइल नंबर वर संपर्क करावा. असे आवाहन करण्यात येत आहे.