सुधीर घाटाळ
ग्रामीण प्रतिनिधी डहाणू
डहाणू/कासा :शुक्रवार, १८ ऑक्टोबर २०२४ रोजी डहाणू तालुक्यातील वेती गावात मनुका कमलाकर बाहोटा यांच्या घरावर अतिवृष्टीमुळे वीज पडून शॉट सर्किट झाले. यामुळे घराला आग लागली आणि घराचे व घरातील वस्तूंचे मोठया प्रमाणात नुकसान झाले.अतिवृष्टीमुळे झालेल्या या आगीमध्ये बाहोटा कुटुंबीयांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या कठीण प्रसंगी तातडीने मदतीसाठी श्रमिकांचा आधार संस्थेचे अध्यक्ष आणि बहुजन विकास आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष अशोक भोईर, डहाणू तालुका अध्यक्ष अरुण निकोले, तसेच गावातील धडाडीचे कार्यकर्ते सायवन विभाग अध्यक्ष गोंदू पवार, जयवंत काटेला, रुपेश भुयाल, रवींद्र बुंधे,चंदू पऱ्हाड, एकनाथ डोकफोडे, एकनाथ हाडळ आणि पत्रकार अरविंद बेंडगा यांनी घटनास्थळी भेट दिली.त्यांनी कुटुंबीयांना तात्काळ मदत म्हणून महिना-दोन महिने पुरेल इतक्या जीवनावश्यक वस्तूंची मदत केली, मदती मध्ये तांदूळ, साखर, मीठ, मसाले, कडधान्य, तेल आदींचा समावेश होता. त्याचबरोबर आर्थिक मदतही करण्यात आली.८०% समाजकारण नव्हे तर १००% या तत्वावर कार्यरत बहुजन विकास आघाडीने तातडीने मदत पुरवून बाहोटा कुटुंबीयांना आधार दिला आहे.