कैलास शेंडे
जिल्हा प्रतिनिधी नंदुरबार
नंदुरबार:विधानसभा निवडणुकीची उमेदवारांची पहिली यादी भाजपने जाहीर केली असून यात ९९ उमेदवार जाहीर झाले आहेत यात शहादा तळोदा विधानसभा मतदारसंघात राजेश पाडवी यांना दुसऱ्यांदा संधी मिळाली आहे.
शहादा-तळोदा मतदारसंघातील भाजप कार्यकर्त्यांची प्रतीक्षा संपली असुन दि.२०ऑक्टोबर रोजी पक्षाने विधानसभा उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली असून यात शहादा-तळोदा विधानसभा मतदारसंघातुन आमदार राजेश पाडवी यांना दुसऱ्यांदा उमेदवारीची संधी देण्यात आली आहे त्यामुळे कार्यकर्त्यांनी तळोदा शहरात जल्लोष करत. पाडवी यांचे अभिनंदन केले आहे.
गेले अनेक दिवसांपासून शहादा-तळोदा विधानसभा मतदारसंघ हा चर्चेत होता सदर मतदारसंघात २०१४ पासून भाजपचे वर्चस्व राहिले आहे. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपच्या तिकिटावर राजेश पाडवी यांचे वडील उदेसिंग पाडवी हे निवडून आले त्यानंतर २०१९ ला पक्षाने त्यांना तिकीट न देता मुलगा राजेश पाडवी यांना उमेदवारी दिली. दोघांनी माजी मंत्री पद्माकर वळवी यांचा पराभव करत मतदारसंघात भाजप संघटन मजबूत केले. आमदार राजेश पाडवी यांनी मतदारसंघात जनसंपर्क वाढवला तसेच अनेक महत्त्वाचे प्रश्न मार्गी लावले आहेत. त्यांचा गत पाच वर्षांचा कार्यकाळ पाहता भाजपने महायुतीचे उमेदवार म्हणून शहादा-तळोदा विधानसभा मतदार संघात आमदार राजेश पाडवी यांना दुसऱ्यांदा संधी दिली आहे पक्षाने दिलेली संधी वाया जाणार नाही या संधीचे सोने करेल अस म्हणत त्यांनी पक्षातील वरिष्ठ नेत्यांचे आभार मानले आहेत.