जावेद कुरेशी
शहर प्रतिनिधी माजलगाव
माजलगाव : विधानसभा निवडणूकीचे वारे वाहू लागले असुन शिवसेना(शिंदे गट)ची गळती सुरू झाले असून माजलगाव शिवसेना शिंदे गट चे उपतालुकाप्रमुख निलेश कांबळे व त्यांचे सहकारींनी एमआयएम पक्षाचे अध्यक्ष खा.असदोद्दीन आवेसी ,आ.अकबर आवेसी, महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष मा.खा.इम्तियाज जलील , बीड जिल्हाध्यक्ष अँड शफिक भाऊ यांचे हात बळकट करण्यासाठी निलेश कांबळे, कमलेश टाकणखर, इंद्रजीत टाकणखर, प्रदीप जाधव, अनिकेत तुपेसमुद्रे, आदित्य टाकणकर, आदित्य बेद्रे, राजदीप शिंदे व अन्य सहकारींनी बीड जिल्हा संपर्क कार्यालय येथे एमआयएम बीड जिल्हाध्यक्ष ॲड शेख शफीक भाऊ यांच्या नेतृत्वाखाली एमआयएम पक्षात जाहीर प्रवेश केला.प्रवेश वेळी निलेश कांबळे यांनी सामान्य नागरिकांचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्नशील होऊन जय भीम जय मीम घोषणा करत प्रत्येक गांव,वाडी,तंडी पर्यंत पक्षाचे विचार सामान्य नागरिकांत पोहचण्यासाठी प्रयत्न करणार आहे अशी प्रतिक्रिया दिली हयावेळी ज्येष्ठ नेते सलाम सेठ, एमआयएम जिल्हा उपाध्यक्ष शेख युसूफ, तालुकाध्यक्ष इद्रिस पाशा, शहराध्यक्ष शेख रशीद व पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.








