सुमेध दामधर
ग्रामीण प्रतिनिधी संग्रामपूर
सोनाळा :- राष्ट्रीय संस्थापक व केंद्रीय अध्यक्ष तथा आय बी सेवन न्यूज चॅनल चे संपादक श्री उत्तम वानखेडे, राष्ट्रीय महासचिव प्रकाश सरदार,राष्ट्रीय संघटक विजय खरात, महाराष्ट्र राज्य अध्यक्ष महेंद्र सावंग, सचिव देवचंद समदूर तर विदर्भ प्रदेश अध्यक्ष किरण उपाध्ये यांच्या उपस्थितीमध्ये भव्य असा बौद्ध पत्रकार बांधवांचा विशेष आढावा बैठक घेण्यात आली. भारतातील बौद्ध पत्रकारांचा न्याय हक्काचा लढा लढवण्यासाठी पत्रकारांच्या पाठिमागे खंबीरपणे उभी राहणारी आंबेडकरी वॉईस मिडिया फोरम् या संघटनेची महत्त्व पूर्ण बैठक दिनांक २०/१०/२०२४ रोजी अशोक वाटिका अकोला येथे आय बी ७ न्यूज चैनलचे संपादक उत्तमजी वानखेडे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. यावेळी देशातील सामाजिक,धार्मिक,आर्थिक, शैक्षणिक तसेच राजकीय क्षेत्राबरोबर पत्रकारिता क्षेत्रावरील एकूणच आव्हानात्मक घडामोडीवर सविस्तर चर्चा झाली. लोकशाहीत देशाचा चौथा आधारस्तंभ असलेल्या मिडियाचा पाया म्हणजेच पत्रकार,पत्रकार सक्षम व निर्भीड बनवण्याचा प्रयत्न करून पत्रकारिता क्षेत्रात काम करत असताना येणाऱ्या विविध अडचणीवर सखोल चर्चा करून यावर तोडगा काढण्यासाठी उपाययोजना करणे गरजेचे आहे. यावर चर्चा होऊन पत्रकारिता क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या प्रत्येक बौद्ध पत्रकार बांधवांसाठी शासन दरबारी राबवल्या जात असलेल्या विविध सुख सुविधा आणि सोयी ज्या की,आपल्या हक्कांच्या आहेत त्या आपल्या पत्रकार बांधवांना कशा उपलब्ध करून देता येईल यावर चर्चा करून संबंधित पत्रकारावर जर कुठला अन्याय अत्याचार,आपत्ती किंवा एखाद्या दुर्जर आजाराने त्रस्त पत्रकाराला शासन दरबारी न्याय,मदत मिळवून देण्यासाठी आपली संघटना कशी काम करेल यावर सविस्तर चर्चा होऊन तळागाळातील पत्रकारांच्या न्याय हक्कासाठी तन-मन-धनाने काम करेल अशी ग्वाही देतानाच पत्रकारांना दर्जेदार मार्गदर्शन,प्रशिक्षित करून आप-आपल्या कार्यक्षेत्रात भरिव तसेच भक्कमपणे उभं करण्यासाठी पत्रकारिते व्यतिरिक्त आणखी इतर व्यवसायिक प्रशिक्षण देऊन आर्थिक सबलता निर्माण करण्यासाठी संघटना कटिबद्ध राहून काम करेल अशी ग्वाही देऊन पत्रकार बांधवांना विमा संरक्षण,दवाखान्याच्या सुख सुविधा,प्रवासाच्या पासेस्,शासकीय निवाऱ्याची व्यवस्था आणि शासन दरबारी पत्रकारांच्या नोंदी यावर पक्ष संघटना जोमाने काम करेल अशी हमी संघटना देत आहे. दरम्यान यावेळी ज्यांना नवीन नियुक्ती देण्यात आली त्यांना लगेच केंद्रीय अध्यक्ष व केंद्रीय सचिव यांच्या सही व शिक्का निशी नियुक्तीपत्रक देण्यात आले. यामध्ये तेल्हारा तालुका अध्यक्षपदी श्री रितेश दारोकार साहेब व संग्रामपुर तालुका अध्यक्षपदी सुमेध भाऊ दामधर संग्रामपूर तालुका उपाध्यक्षपदी श्री निलेश लहासे अशा विविध जिल्ह्यांमध्ये विविध पदे देऊन त्यांना ओळखपत्र व नियुक्त पत्र देण्यात आले. ग्रामीण,शहरी आंबेडकरी विचारसरणीच्या पत्रकारांच्या विभागीय,जिल्हा,तालुका व शहर स्तरावर नियुक्त्या करण्यात आल्या. सर्वांनी एकसंघ राहून उत्स्फूर्तपणे कार्य करण्याचा दॄढनिचय करून समता,स्वातंत्र्य,बंधुता,न्याय व बुद्ध तत्वज्ञान या पंच सूत्रावर आंबेडकरी वॉईस मिडिया फोरम या संघटनेची वाटचाल सुरु राहील असा आशावाद अखेर बैठकीच्या समारोपीय सत्रात व्यक्त करण्यात आला.