रितेश टीलावत
जिल्हा प्रतिनिधी अकोला
दरवर्षी जागर फाउंडेशन रद्दी संकलनातून निराधारांची दिवाळी हा उपक्रम राबवून माणुसकीचा जागर करत असते. यासाठी समाजातील विविध स्तरातील संवेदन शील परिवार मनःपूर्वक आपले योगदान देत आहेत. यावर्षी पुन्हा शालेय विद्यार्थी नी व पालकांच्या आग्रहास्तव पायी प्रवास करून शाळा गाठणाऱ्या शंभर विद्यार्थिनीं ना सायकल भेट देण्याचा निर्धार केला आहे. यासाठी लागणारी रक्कम कोणी रद्दीच्या स्वरूपात तर कोणी थेट रक्कम पाठवून सहभागी होत असते.आपणाकडून मिळणारी रद्दी असो वा रक्कम छोटी आहे की मोठी हे महत्त्वाचे नाही तर आपल्या पुढाकाराने एका कुटुंबातील मुलगी शिक्षण घेण्यासाठी पुढे येणार आहे. तेव्हा ह्या मानव धर्म जपणा ऱ्या कार्यास आपण यावर्षी सुद्धा सामाजिक निधी म्हणून कणभर तरी योगदान पाठवावे असे आवाहन
तुळशिदास खिरोडकार
संयोजक, जागर फाउंडेशन
9970276582 यांनी केले आहे.


