सुदर्शन मंडले
ग्रामीण प्रतिनिधी जुन्नर
आळेफाटा ता. १९ वडगाव आनंद येथे शुक्रवारी सकाळी दहा वाजता एकाच वेळी तीन बिबट्यांचा मुक्त संचार पाहून नागरिकांना मोठा धक्का बसला आहे. शेतात चाललेल्या एका शेतकऱ्यांने ते सगळं मोबाईल मध्ये कैद केले. संबंधित शेतकरी हा ट्रॅक्टरमध्ये असल्यामुळे तो बचावला. ही घटना जुन्नर तालुक्यातील आळेफाटा परिसरातील मोरया हॉस्पिटल जवळील आहे.
जुन्नर तालुक्यातील बिबट्याची दहशत दिवसेंदिवस वाढली असल्याच्या रोज नव्याने पाहायला मिळत आहे. बिबट्याचे मानवी हल्ले किंवा पाळीव प्राणी हल्ल्याचे प्रमाणही वाढत आहे. आळेफाटा परिसरात मोठया रहिवाशी इमारती झाल्या आहे. बिबट्याची संख्या वाढत असल्यामुळे नव्याने जन्म झालेले बछडे अन्न व पाण्याच्या शोधात थेट आळेफाटा परिसरात येत आहे. मात्र आळेफाटा परिसरात दाखल झालेले बिबटया पकडण्यासाठी वनविभागाच्या अधिकाऱ्यांना तारेवरची कसरत करावी लागणार आहे. तीन बिबटे उभे असलेला हा विडिओ सगळीकडे व्हायरल होत आहे.