भरत पुंजारा
ग्रामीण प्रतिनिधी पालघर
पालघर,वेती-जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेचे संस्थापक मा.श्री. निलेशजी भगवान सांबरे यांच्या नेतृत्वाखाली, संपूर्ण कोकण ठाणे,पालघर जिल्ह्यात तालुक्यात शाळेतील विध्यार्थी हा शिकला पाहिजे, अधिकारी घडला पाहिजे, हे जिजाऊ चं हेतूने गेल्या १५ वर्षांन पासून जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थे च्या वतीने मोफत वह्या वाटप करण्यात येत आहेत, तसेच मागील १३ संप्टेंबर रोजी जिजाऊ कामगार संघटनेचे सचिव- पालघर श्री. महेंद्र राजू तांबडा जिल्हा यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून सामाजिक बांधिलकी जिजाऊ सदस्य म्हणून आपलं कर्तव्य बजावण्याचं काम हाती घेऊन डहाणू तालुक्यातील जि. प. शाळा पाटिलपाडा वेती, जि. प.शाळा काटेलापाडा वेती, जि. प. शाळा वरोती, जि. प. शाळा वरोती वळवीपाडा, असे ४ शाळेवर एकूण ११२६ एक हजार एकसे सव्वीस वह्या वाटप करण्यात आल्या, वर्षांनी वर्ष जिजाऊ संस्थेचे उपक्रम श्री. निलेशजी सांबरे यांच्या नेतृत्वाखाली श्री. महेंद्र तांबडा यांच्या पुढाकारणे उपक्रम राबवले जात आहेत, गेल्या वर्षी देखील एक हजाराहुन अधिक विध्यार्थीना मोफत वह्या वाटप करून मोफत आरोग्य शिबीर लावण्यात आला होता, जिजाऊ संस्था ही नेहमीच गोरगरीबांना आरोग्य, शैक्षणिक, आर्थिक मदतीला पाठपुरावा करते तसेच, अनाथाचा नाथ कैवारी आमचे गुरुवर्य मा.श्री. निलेशजी सांबरे यांचं कार्य एक मोलाचं ठरवले जाते,
-महेंद्र सुरेखा राजू तांबडा
जिजाऊ का. संघटना महाराष्ट्र राज्य
सचिव -पालघर जिल्हा.


