संजय शिंदे ग्रामीण प्रतिनिधी इंदापूर
दिनांक १५ रोजी सकाळी ०८:०० वा चे सुमारास भिगवण पोलीस स्टेशन येथे माहीती मिळाली की, मौजे मदनवाडी, वीरवाडी गावचे हददीत फॉरेस्टचे जागेमध्ये एक अनोळखी पुरूष इसमाची मयत्त बॉडी पडली आहे. त्याचे डोक्यात दगड मारून त्याचा खुन केलेला आहे. अशी माहीती मिळताच भिगवण पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी विनोंद महांगडे, सहा. पोलीस निरीक्षक यांनी तात्काळ घटनास्थळी दाखल होवुन मा. वरीष्ठांचे मार्गदर्शनाखाली तपासाचे दुष्टीने तात्काळ तपास टिम तयार करून अतिशय नियोजन बध्दरित्या तपास करून अनोळखी मयताची तात्काळ ओळख पटवून सदर मयताचे नाव विजयकुमार विठलराव काजळे, वय. ४४ वर्ष, रा. मदनवाडी, बंडगरवस्ती, ता. इंदापुर, जि.पुणे असे असल्याचे निष्पन्न करून. अतिशय सचोटीने व बारकाईने, तांत्रिक विश्लेषन, विविध ठिकाणचे सी.सी.टी.व्ही फुटेज व गोपनिय बातमीदारा मार्फत माहीती काढून अवघ्या काही वेळातच इसम नामे राज भगवान शिंदे, रा. बंडगरवस्ती, मदनवाडी, ता. इंदापुर, जि.पुणे यास ताब्यात घेवुन त्यांचेकडे अधिक विचारपुस करता त्याने यातील मयत नामे विजयकुमार विठलराव काजळे हा त्याचा मित्र असुन त्याने त्यास शिवीगाळ केल्याचे कारणावरून त्याचे डोक्यात दगड मारून त्याचा खुन केला असल्याची कबुली दिली. मयत इसम नामे विजयकुमार विठलराव काजळे याची पत्नी नामे श्रीमती भाग्यश्री विजयकुमार काजळे, रा. मदनवाडी, बंडगरवस्ती, ता. इंदापुर, जि. पुणे, मुळ रा. निरगुडे, ता. इंदापुर जि.पुणे हिने इसम नामे राज भगवान शिंदे, रा. बंडगरवस्ती, मदनवाडी, ता. इंदापुर, जि. पुणे यांचेविरूध्द तकार दिली असुन त्याबाबत भिगवण पोलीस स्टेशन, गुन्हा. रजि. नंबर. ३३४/२०२४, भारतीय न्याय संहीता सन. २०२३ चे कलम. १०३ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर गुन्हयाचा पुढील तपास विनोंद महांगडे, सहा. पोलीस. निरीक्षक हे स्वतः करीत आहेत. सदरची कामगिरी मा. पंकज देखमुख साो, पोलीस अधीक्षक, पुणे ग्रामीण, मा.गणेश बिराजदार साो, अपर पोलीस अधीक्षक, बारामती विभाग, पुणे ग्रामीण, मा. डॉ. सुदर्शन राठोड सो, उपविभागीय पोलीस अधीकारी, बारामती विभाग, मा. अविनाश शिळीमकर साो, वरीष्ठ पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, पुणे ग्रामीण, मा.सुर्यकांत कोकणे साो, पोलीस निरीक्षक, इंदापुर पो. स्टे यांचे मार्गदर्शनाखाली विनोद महांगडे, सहा पोलीस निरीक्षक, भिगवण पो.स्टे, राजकुमार डुनगे, सहा. पो. निरीक्षक, वालचंदनगर पो.स्टे, कुलदीप संपकाळ, सहा. पो. निरीक्षक, स्था.गु.अ. शाखा पुणे ग्रा, भिगवण पो. स्टेचे पोलीस उपनिरीक्षक प्रविण जर्दै, अमित पाटील पोलीस अंमलदार प्रदीप नलावडे, सचिन पवार, विजय लोडी, पांडुरंग गोरवे, समीर झांबरे, संतोष मखरे, आप्पा भांडवलकर, रणजीत मुळीक, अनिकेत शेळके, योगेश कांबळे, सारोका जाधव, स्थानिक गुन्हे शाखा पुणे ग्रामीणचे पोलीस अंमलदार बाळासाहेब कारंडे, अभिजीत एकशिंगे, स्वप्नील अहीवळे, अजय घुले, निलेश शिंदे, यांनी केली आहे.