सुदर्शन मंडले ग्रामीण प्रतिनिधी जुन्नर जुन्नर ता. १५ जुन्नर ते कारखाना फाटा रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली होती. रस्त्यावर जागोजागी खड्डेच खड्डे पडलेले होते. हि बाब वंचित बहुजन युवा आघाडीचे जुन्नर तालुका अध्यक्ष महेश पठारे यांच्या निदर्शनास आल्यावर त्यांनी दिनांक २५ सप्टेंबर २०२४ रोजी सार्वजानिक बांधकाम विभागाच्या जुन्नर येथील कार्यालयास लेखी निवेदन दिले होते. जुन्नर ते कारखाना फाटा मार्गावरील जुन्नर ते शिरोली विविध कार्यकारी सोसायटी दरम्यानचा रस्ता अत्यंत खराब झाला होता, रस्त्यावर अपघाताचे प्रमाण वाढले होते.त्या रस्त्याची तातडीने दुरुस्ती करण्यात यावे अन्यथा रस्त्यांवरील खड्ड्यांमध्ये वृक्षारोपण करण्यात येईल असा इशारा निवेदनाव्दारे देण्यात आला होता. त्यांची दखल घेत. सार्वजानिक बांधकाम विभाग प्रशासनाने सदर रस्त्याचे काम त्वरीत सुरू केले आहे.अशी माहिती जुन्नर तालुका वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष गणेश वाव्हळ दिली.


