भरत पुंजारा.
ग्रामीण प्रतिनिधी पालघर
तलासरी- कोचाई या गावातील एक अठरा वर्षाची तरूणी वेदांत रुग्णालय धुंदलवाडी, डहाणू येथे उपचार घेत असताना तिला पुढील उपचारासाठी A+ रक्ताची आवश्यकता आहे असं डॉक्टरांनी रुग्णाच्या नातेवाईकांना सांगितले. रुग्णाच्या नातेवाईकांनी लगेचच जवळपासच्या रक्तपेढींशी संपर्क साधुन आम्हाला रक्ताची आवश्यकता आहे असं सांगितलं पण त्या रक्तपेढीत रक्त उपलब्ध नव्हते.शेवटी त्यांनी पालघरमधील समाजकार्यात तत्पर असलेली यारी दोस्ती फाउंडेशन यांच्याशी संपर्क साधून रुग्णाची सर्व हकीकत सांगितली.यारी दोस्ती फाउंडेशनने लगेचच आपल्या व्हाट्सॲप ग्रुपवर तातडीने रक्ताची आवश्यकता आहे असा मेसेज टाकला असता लगेचच त्या मेसेजला प्रतिसाद देत संस्थेचे सदस्य धर्मवीर धुम यांनी आपण रुग्णाला रक्त द्यायला तयार आहे असं सांगितलं.त्यांनी आपलं काम सोडून लगेच वेदांत रुग्णालय धुंदलवाडी, डहाणू येथे जाऊन रक्तदान केले व रुग्णाला एक प्रकारे जिवदान दिले.त्यांच्या या कार्याबद्दल रुग्णाच्या नातेवाईकांनी धर्मवीर व संस्थेचे खुप खुप आभार मानले.यारी दोस्ती फाउंडेशन हे अनेक लहानमोठे समाजसेवेचे कार्य करत असतात. यामध्ये गरजु रुग्णांना प्रत्येक्ष रुग्णालयात जाऊन रक्तदान करणे, गरजु व्यक्तींना किराणा किट, मुलांना शैक्षणिक साहित्य वाटप, ब्लेकेट वाटत, मिठाई वाटप असे उपक्रम राबवत असतात. हे सर्व उपक्रम राबवत असताना ते स्वतः ज्यांना शक्य होईल तितके पैसे गोळा करून त्या पैशातून वस्तू खरेदी करून गरजुंना मदत करतात.त्यांच्या या आगळ्यावेगळ्या समाजसेवेबद्दल सर्वच स्तरातून संस्थेचे कौतुक केले जात आहे.