जलील शेख तालुका प्रतिनिधी,पाथरी
यावर्षी चांगले पाऊस पडल्यामुळे प्रत्येक वार्डातील अनेक खड्ड्यात आणि नाल्यात पाणी साचल्यामुळे पाथरी शहरात मच्छराने उच्छाद मांडला आहे. नगरपालिका प्रशासनाने याकडे लक्ष देऊन नियमित धूर फवारणी करावी अशी मागणी शहरातील सुज्ञ नागरिकांच्या वतीने व्यक्त होत आहे. विविध प्रजातीच्या मच्छराने चावल्यामुळे ताप,खोकला आणि डेंग्यू सारख्या आजाराचा धोका बळावत आहे. याकडे विशेष लक्ष देऊन नागरिकांच्या आरोग्याची काळजी म्हणून स्वच्छतेकडे लक्ष पूर्वत मुख्याधिकारी आणि नगरपालिका प्रशासनाने वेळीच उपाययोजना कराव्यात आणि नगरपालिकेच्या वतीने वेळोवेळी नियमाप्रमाणे करण्यात येणारी धूर फवारणी करावी अशी मागणी जोर धरत आहे.कारण मागील १८ महिन्यापासून कोणत्याही प्रभागात धूर फवारणी करण्यात आली नसल्याचे शहरातील जबाबदार नागरिकांच्या वतीने सांगण्यात आले.