विश्वास काळे उप जिल्हा प्रतिनिधी यवतमाळ
यवतमाळ: सध्या शेतकऱ्यांची सोयाबीन काढण्याची लगबग सुरू आहे. यावर्षी कमी जास्त असलेला पाऊस वातावरणातील बदल आणि पिकावर येणाऱ्या व्हायरस मुळे शेतकरी अक्षरशः अडचणीमध्ये सापडला आहे. सोयाबीन पिकाला एकरी मिळावा असा उतार मिळत नाही. या अगोदर एकरी ९ ते १० क्विंटल एकरी होणारे सोयाबीन यावर्षी एकरी ४ ते ५ क्विंटल वर आले आहे. उत्पन्नापेक्षा खर्च जास्त झाल्यामुळे शेतकरी अडचणीमध्ये सापडला आहे. शासनाने सोयाबीन पिकासाठी ४८९० रुपये हमीभाव जाहीर केला असला तरीही प्रत्यक्षात मालाची विक्री करत असताना मात्र सोयाबीन व्यापारी ४२०० रुपयाने खरेदी करत आहेत. दुसरी गोष्ट जे व्यापाऱ्याकडे सोयाबीनमधील माऊचर तपासण्याच्या जे मशीन आहेत. त्या मशीन मध्ये तफावत आढळून येत आहे. काल ढाणकी या ठिकाणी एका दुकानावर १४ माउचर दाखवत असताना दुसऱ्या दुकानावर त्याच सोयाबीनचे माऊचर १६ असे दाखवत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण तयार झाला आहे. खरंच हा विचार करण्यासारखा प्रश्न आहे. ढाणकी ही उमरखेड तालुक्यातील सर्वात मोठी बाजारपेठ असून या ठिकाणी जवळपास७० ते ८० गावातील शेतकरी आपला सोयाबीन विक्रीसाठी आणत आहेत. काहीच दिवसावर दिवाळी आली असल्यामुळे शेतकऱ्यांना पैशांची आवश्यकता आहे. त्यामुळे व्यापारी हमीभावापेक्षा ६०० ते ७०० रुपयाने कमी घेऊन शेतकऱ्याची आर्थिक फसवणूक करत आहेत. या सर्व गोष्टी प्रशासनाने लक्षात घेऊन अशा दोशी व्यापाऱ्यावर कारवाही करून त्यांचे परवाने रद्द करण्यात यावे अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.


