प्रमोद शिंदे तालुका प्रतिनिधी माळशिरस
अकलूज प्रांत कार्यालय अकलूज येथे उपविभागीय दक्षता व नियंत्रण समितीची मासिक आढावा बैठक समितीचे अध्यक्ष उपविभागीय अधिकारी विजया पांगारकर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न झाली. या बैठकीमध्ये एन डी एम जे चे राज्याचे सचिव, उपविभागीय दक्षता नियंत्रण समिती सदस्य वैभव गीते यांनी 1 ते 26 मुद्द्यांवर अध्यक्षांसमोर विविध प्रश्न मांडले.आणि या प्रश्नांचे विविध विभागातील अधिकारी यांनी प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला. यामध्ये प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे, महात्मा फुले जन आरोग्य योजनेतील समस्या, प्रत्येक शाळेत पोस्को ई-बॉक्स बसवण्यासंदर्भात शिक्षण विभागाला सूचना .तसेच तालुक्याती पिरळे ,धर्मपुरी, देशमुख वाडी व इतर गावातील स्मशानभूमी, कामे तात्काळ सुरू करण्याची मागणी करण्यात आली. यावेळेस आंबेडकरी चळवळीचे नेते विकास दादा धाईंजे, राज्य सचिव वैभव गीते माळशिरस तालुक्याचे तहसीलदार सुरेश शेजूळ, गट विकास अधिकारी डॉ आबासाहेब पवार, निमंत्रण सदस्य प्रमोद शिंदे,धनाजी शिवपालक,संजय झेंडे, बाबासाहेब सोनवणे,दत्ता कांबळे, संजय, ऍड नवनाथ भागवत, अविनाश ताकतोडे, तसेच पोलीस विभाग, व इतर विभागातील अधिकारी अनेक सदस्य उपस्थित होते.