कैलास खोट्टे जिल्हा प्रतिनिधी बुलढाणा
परमपूज्य श्री माताजी निर्मला देवी प्रणित कुंडलीनी जागृती व आत्मसाक्षात्काराची अनुभूती यामध्ये सर्वांना मिळते. सहज योग हा भारतातच नाही तर 160 देशांमध्ये प्रसारित झाला आहे. परमपूज्य श्री माताजी निर्मला देवी यांचे सहज योग ध्यान केंद्र सर्व जिल्ह्यात,तालुक्यात, गावागावात आहेत या सहज योग ध्यानामुळे माणसाची शारीरिक, मानसिक, आर्थिक स्थिती सुधारते. परमपूज्य श्री माताजींचा मध्य प्रदेश मधील छिंदवाडा येथे जन्म झाला असून श्री माताजींची दिल्ली येथे समाधी आहे. 21 मार्च 1923 मध्ये श्री माताजींचा जन्म झाला असून 2023 मध्ये 100 वर्ष पूर्ण होत आहेत यानिमित्त भारत सरकारने श्री माताजींचे शंभर रुपयाचे नाणे मा.केंद्रीय मंत्री (रस्ते वाहतूक व महामार्ग) नितीन जी गडकरी यांच्या हस्ते दी.14 ऑक्टबर रोजी 100 रुपयांच्या नान्याचे अनावरण राष्ट्रीय संग्रहालय सभागृह नवी दिल्ली येथे करण्यात आले.सर्व सहजयोग परिवार साठी हि फार महत्त्वाची व खूप आनंदाची गोष्ट आहे.ही ऐतिहासिक घटना म्हणजे मानवतेला शांतता, प्रेम आणि आंतरिक परिवर्तनासाठी मार्गदर्शन करण्याच्या तिच्या अथक प्रयत्नांची ओळख आहे.परम पूज्य श्री माताजी निर्मला देवी यांच्या संग्रामपूर येथील आश्रम साठी आश्रमसाठी मा.आमदार डॉ.संजय कुटे यांनी 50 लाख रुपयाचा निधी मंजूर करून दिला.त्यांचे सुद्धा सर्व सहजयोगी पुन्हा एकदा मनापासून आभार मानत आहेत.


