गजानन जिदेवार तालुका प्रतिनिधी हदगाव
लाडकी बहीण योजनेसाठी चक्क पुरुष मंडळीच्या आधार कार्डाचा वापर करून जवळपास सव्वा तीन लाख रूपयांची रक्कम भावाच्या खात्यात पैसे जमा करून घेतले. यातून काही जणांची किरकोळ रक्कम देवून बोळवण केली. यानंतर बिंग फुटताच मनाठा येथील अनाधिकृतरित्या सीएससी केंद्र आणि झेरॉक्स सेंटर चालक फरार झाला. बोगस या प्रकारामुळे खळबळ उडाली आहे.महाराष्ट्र शासनाच्या वतीने महिलांसाठी मुख्यमंत्री लाडकी वहीण योजना सुरू केली. या योजनेत दीड हजार रुपये प्रति महा मिळत आहेत. मात्र काही दिवसापूर्वी अकोला येथे या योजनेचा गैरफायदा घेणाऱ्या सहा जणांवर कार्यवाही करण्यात आली. ही घटना ताजी असताना हदगाव तालुक्यातील मनाठा येथे वोगस आणि धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. मनाठा येथील ३० ते ४० पुरूषांचे गावात असलेल्या अनाधिकृत सीएससी तथा सचिन झेरॉक्स सेंटर या नावाने दुकान चालविणाऱ्याने आधार कार्ड घेऊन लाडकी बहिण योजनेचे फॉर्म भरले आणि त्या अजार्ला आप्रोल मिळविले. यामुळे त्यांच्या खात्यात ४५०० रुपये या प्रमाणे तीन लाख 19 हजार पाचशे रुपये जमा झाले. ही गोष्ट हेरून त्या झेरॉक्स सेंटर चालकाने तुमचे रोजगार हमी योजना, विहीरीचे पैसे जमा झाल्याचे सांगत ते माझेच आहेत म्हणून काहींना ५०० तर २०० रुपये देऊन त्यांची उर्वरित रक्कम स्वतःकडे ठेवले. यातील काही जणांना लाडक्या वहिण योजनेचे पैसे असल्याचे लक्षात येताच त्या झेरॉक्स सेंटरचालकास जाव विचारला असता त्यांनी मात्र सगळ्याचे पैसे घेऊन तो फरार आहे. या बावत अधिकृत यादी मात्र मिळू शकली नसली तरी काही जणांचे अप्रोल मात्र हाती लागले आहेत. या गंभीर वावीला जवावदार कोण? असा प्रश्न निर्माण झाला असून मंजूर करणाऱ्या समितीला पुरुष की महिला हे का लक्षात येऊ नये, यावावत आर्चय व्यक्त होत आहे. तर जिल्ह्यात बारकाईने तपासला तर कित्येक प्रकार उघड होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तर काही जणांनी ५०० रुपये घेऊन लहान १३ ते १४ वर्षाच्या मुलीचे सुध्दा वय वाढवून लाभ देण्यात आला आल्याचे सुद्धा वोलले जात आहे. या बोगस कारनाम्यासाठी दुसऱ्याची आय डी वापरण्यात आला अशी चर्चाही होत आहे परंतू हा प्रकार आम्हाला काहीच माहीत नसायचे काही तरूणांनी सांगितले.


