जलील शेख तालुका प्रतिनिधी,पाथरी
मागील वीस वर्षापासून प्रालंबित असलेल्या ग्रामरोजगार योजनेतील सेवकांचे अल्पसंख्यांक प्रदेशाध्यक्ष सईद खान यांच्या प्रयत्नामुळे मानधन वाढ करण्यात आली. याविषयी आज राज्य सरकारने जीआरही काढले आहे.या निमित्ताने सईद खान यांचे शिवसेना भवन पाथरी येथे भव्य सत्कार करण्यात आले.यावेळी संघटनेचे कर्मचारी विलास सत्वधर (जिल्हाध्यक्ष परभणी ),संतोष गलबे,रामप्रसाद खुडे (जिल्हा उपाध्यक्ष )भास्करराव (तालुका अध्यक्ष पाथरी), संतोष कापसे (तालुका अध्यक्ष मानवत), बाबासाहेब धर्मे,दत्तराव नखाते,माधव झोडपे,तुकाराम गोंगे,बाबाराव कदम,नसीर शेख,गंगाधर चव्हाण(तालुका अध्यक्ष सोनपेठ) आदींची उपस्थिती होती.