व्येकटेश चालुरकर तालुका प्रतिनिधी अहेरी
अहेरी तालुक्यात पेरमिली येथे ग्रामपंचायत कार्यालय व वनविभाग मार्फत अनुमती देण्यात देण्यात आले आहे. व पत्रकार भवना करीता जागा उपलब्ध करून त्या ठिकाणी गावातील प्रतिष्ठित नागरिकानी उदघाटन करण्यात आले आहे. काल गडचिरोली चिमूर लोकसभा क्षेत्राचे खासदार नामदेवराव किरसाण यांनी आलापल्ली येथे भव्य पदाधिकारी व कार्यकर्ता मेळाव्यात उपस्थित होते. या वेळी युवा ग्रामीण पत्रकार संघटने मार्फत निवेदन देण्यात आले आहे. निवेदन देतेवेळी खासदार नामदेवराव किरसाण म्हणाले की, तात्काळ निधी उपलब्ध करून देईन असे आश्वासन देण्यात आले.या वेळी युवा ग्रामीण पत्रकार संघांचे उपाध्यक्ष जावेद अली, सचिव नीलिमाताई बंडमवार, डॉ.शंकर दुर्गे,सुरेश दुर्गे, कोषाध्यक्ष सुरेश मोतकुरवार, संतोष बोम्मावार, आशिफखान पठाण,मोहसिन शेख, राकेश येलकुंची,जितेंद्र दागाम,व्यंकटेश चालूरकर इत्यादी पदधिकारी उपस्थित होते.