रितेश टीलावत जिल्हा प्रतिनिधी अकोला
अकोट येथील प्रख्यात उद्यमी,पूर्वा कन्सल्टन्सी चे संचालक माननीय श्री प्राध्यापक नवनीत जी लखोटीया यांचा आज वाढदिवस.वाढदिवसा च्या निमित्ताने उद्योग व शिक्षण व राजकारण क्षेत्रात अष्टपैलू खेळाडू म्हणून नावलौकिक असलेले प्राध्यापक नवनीत जी लखोटिया यांना वाढ दिवसाच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा. बांधकाम क्षेत्र म्हटले की आपल्या डोळ्यां पुढे येते ते रेती, सिमेंट, लोखंड आणि विटा आदि साहित्य , या सर्व साहित्या च्या एकत्रितरणातून आपण ज्याला निर्जीव समजतो असे घर उभे राहते. परंतु या घरा ला सजीव करत ते आपल्या घरातील व्यक्तीअसंच निर्जीव वस्तूंना एकत्र करून घर उभ करणाऱ्या प्राध्यापक श्री नवनीतजी लखोटिया या वास्तुविशारदाने सामाजिक भान जपत घराला सजीव रूप देण्याच्या प्रयत्न आप ल्या कर्तुत्वाने केला आहे. बांधकाम क्षेत्राकडे केवळ व्यवसाय म्हणूनच न पाहता सामाजिक सेवेचे कार्य मानणाऱ्या लखोटिया यांनी या क्षेत्रात नैतिकतेचा नवा मापदंड निर्माण केला आहे. म्हणूनच एक विश्वासू वास्तु विशारद म्हणून लखोटिया यांच्याकडे पाहण्याचा दृष्टि कोन शेकडो नागरिकांचा बनला आहे. आपल्या कामा त सचोटी आणि प्रामाणिक ता याला महत्त्व देत आज सर्व दूर आपल्या कर्तुत्वा ची छाप त्यांनी पाडली आहे. प्रसन्न व्यक्तिमत्त्वाचे धनी असलेले नवनीत लखोटिया अकोट शहरात शिल्पकार म्हणून सुपरिचित आहेत. मूळचे तेल्हारा तालुक्यातील हिवरखेड येथील असलेल्या यांचे वडील श्री.भोजराज जी लखोटिया.याचवर्षी प्राध्यापक नवनीत जी लखोटिया यांना विदर्भ रत्न पुरस्कार साठी निवड झाली व विविध मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत दिनांक 30 मे 2023 रोजी सदरहू पुरस्कार प्रदान करण्यात आले ही येथे उल्लेखनीय बाब.श्री.नवनीत सर यांचे प्राथमिक शिक्षण अकोट येथील नगरपालिके च्या शाळेत झाले. माध्यमिक शिक्षण अकोटच्या नरसिंग विद्यालयात, तर कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षण विज्ञान शाखेमधून शिवाजी अभियांत्रिकी महाविद्याल यात बी. आर्क. शाखेत प्रवेश घेतला. हा अभ्यासक्रम पूर्ण केल्यावर पुढे याच महाविद्या लयात काही काळ प्राध्या पक म्हणून श्री. लखोटिया यांनी काम केले. पुढे आपण स्वतंत्र व्यवसाय सुरू करावा या भावनेने श्री. लाखोटिया यांनी प्राध्यापक पदाची नोकरी सोडली व अकोट गाठले. येथे वास्तु विशारद म्हणून त्यांनी काम सुरू केले. सुंदर वास्तु उभी करण्यासाठी नकाशा काढून डिझाईन तयार करणे सुरू केले. नंतर श्री लखोटिया यांनी बांधकाम व्यवसायात उतरण्याचा निर्णय घेतला. वास्तविक पाहता लखोटीया हे पुणे मुंबई सारख्या ठिका णी जाऊन पैसे मिळू शकले असते मात्र त्यांना आपल्या शहरात राहूनच नवीन काहीतरी करायचे होते. आज येथील प्रख्यात उद्यमी , पूर्वा कन्सल्टन्सी चे संचालक म्हणून माननीय श्री. प्राध्यापक नवनीत जी लखोटीया यांचं मोलाचं स्थान प्राप्त आहे. त्यांची यावर्षी विदर्भ रत्न पुरस्कार साठी निवड झाल्यामुळे संपूर्ण अकोला जिल्ह्यातून त्यांच्यावर अभिनंदना चा वर्षाव सुद्धा झाला होता. मागील अनेक वर्षापासून प्राध्यापक लखोटिया यांच्या मार्गदर्शना अकोटच नव्हे तर संपूर्ण अकोला जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी छोट्या छोट्या गावात सुद्धा लेआउट प्लॉट्स, अपार्ट मेंटस बनविण्यात आले आहेत. अतिशय वाजवी दरात गरजू लोकांना स्वतःचे घर निर्माण करण्याचे स्वप्न पूर्ण करण्याकरता, प्राध्या पक नवनीत लखोटिया यांनी प्रत्येकाच, स्वतःच घर असाव याकरिता ते नेहमी प्रयत्नशील असतात. अति शय मनमिळाऊ स्वभावाचे प्राध्यापक नवनीत लखोटीया यांनी उद्योग क्षेत्र सोबतच शैक्षणिक क्षेत्रात सुद्धा परिसरात आपले प्रथम स्थान मिळविले आहे. प्राध्यापक श्री.नवनीत लखोटिया हे सेंट पॉल अकॅडमी चे संस्थापक अध्यक्ष असून मॉर्निंग स्टार मल्टी परपज सोसायटी चे सुद्धा अध्यक्ष आहेत.श्री. लखोटिया यांना त्यांच्या कार्यात पत्नी सौ. शारदा लखोटीया सामाजिक कार्यकर्ता तथा माहेश्वरी समाज अकोल्याच्या सचिवयांचे पूर्ण सहकार्य मिळत आहे.मुलगी पूर्वा टावरी हिचे एम.बी.बी.एस. चे शिक्षण एम.डी.चे शिक्षण पूर्ण केले आहे.मुलगा दीपम यांनी इंजिनीयरिंग व एमबीए चे शिक्षण पूर्ण केले आहे. सून सौ अवनी लखोटिया हिचे सुद्धा इंजिनियर व एमबीए पूर्ण झाले आहे.श्री नवनीत लखोटिया यांचे संपूर्ण कुटुंब एकत्रित असून ते श्री. किशोर लखोटीया आणी श्री. राजेश लखोटिया यांच्यासोबत राहतात. श्री. लखोटिया यांना आतापर्यंत अनेकदा विविध क्षेत्रात पुरस्कार मिळालेली आहेत.विदर्भ भूमी ने विविध क्षेत्रात सुयश प्राप्त करणाऱ्या अनेक यशस्वी व लोकप्रिय अशा उद्योजकांना जन्म दिला आहे. अशाच एका लोकप्रिय प्राध्यापक नवनीतजी लखोटीया यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा.