मनोज गवई जिल्हा प्रतिनिधी अमरावती
केंद्र शासनाच्या निर्देशानुसार दरवर्षी एक सप्टेंबर ते 30 सप्टेंबर या कालावधी दरम्यान राष्ट्रीय पोषण माह देशभर साजरा करण्यात येत असतो. या पोषण महिन्यानिमित्त स्थानिक राजर्षी शाहू विज्ञान महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजने अंतर्गत ऍनिमिया व्यवस्थापन व प्रतिबंध या विषयावर दिनांक २७ सप्टेंबर ला व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.पराग वडनेरकर होते तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ अमरावती येथील गृहशास्त्र विभागाच्या सहाय्यक प्राध्यापक डॉ. दिपाली भैसे या होत्या.डॉ.वडनेरकर यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून पोषण हा आपल्या शारीरिक व मानसिक विकासाचा महत्त्वाचा भाग असून उत्तम पोषण हे बालक आणि गरोदर माता यांचे आरोग्यव रोगप्रतिकार शक्ती मजबूत करणे व दीर्घायुष्यशी संबंधित असून आपल्या दैनंदिन जीवनशैलीमध्ये विद्यार्थिनींनी चिप्स व मॅगी यासारख्या पदार्थ टाळून सकस आहार घ्यावा जेणेकरून आपले हिमोग्लोबिन वाढेल असे प्रतिपादन केले. डॉ. दिपाली भैसे यांनी आहारावर मार्गदर्शन करताना पोषण आहार एक संतुलित आहार आहे. दररोजच्या जेवणामध्ये हिरव्या पालेभाज्या ,रानभाज्या ,मोड आलेले धान्य यांचा प्रमुख्याने समावेश करावा व शक्यतोवर साखरेवर नियंत्रण ठेवून गुळाचा वापर करण्यास प्राधान्य दिले पाहिजे .चहा कॉफी यासारखे पदार्थ वर्ज करावेत असा मोलाचा सल्ला अनेमिया व्यवस्थापन व प्रतिबंध या विषयावर मार्गदर्शन करताना दिला. राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी डॉ. गजानन संतापे यांनी पोषण आहाराच्या जनजागृती करिता यावर्षीची थीम ऍनिमियावर असून त्यावरील विषयाचे व्याख्यानाचे आयोजन केलेले आहे असे प्रास्ताविकाद्वारे सांगितले. कार्यक्रमाचे आयोजना करिता महिला कार्यक्रम अधिकारी प्रा.ममता पळसपगार यांनी परिश्रम घेतले.या कार्यक्रमाचे संचालन राष्ट्रीय सेवा योजनेची स्वयंसेवक बीएससी फायनल ची विद्यार्थिनी कु. कोमल काळे तर आभारप्रदर्शन बीएससी. भाग एक ची विद्यार्थिनी कु.गौरी सोळंके हिने केले.याकार्यक्रमालामहाविद्यालयातील प्राध्यापक व राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक व विद्यार्थी उपस्थित होते.