कैलास शेंडे जिल्हा प्रतिनिधी नंदुरबार
नंदुरबार:ता-२८-: तळोदा येथील आर्ट्स कॉमर्स ट्रस्टच्या समाजकार्य महाविद्यालयाला (ता २६) वार गुरुवार व (ता.२७) वार शुक्रवार रोजी महाविद्यालयाची गुणवत्ता तपासणीसाठी नँक मूल्यांकन समितीने भेट दिली.मूल्यांकन समितीचे चेअरमन म्हणून सी.पी.सिंग हे होते तर समन्वयक सदस्य म्हणून विजया नायडू तर सदस्य म्हणून प्रणव मिश्रा हे उपस्थित होते. या समितीने दोन दिवसात महाविद्यालयाच्या अंतर्गत येणाऱ्या गुणवत्ता हमी कक्ष, ग्रंथालय विभाग, क्रीडा विभाग, राष्ट्रीय सेवा योजना विभाग, कार्यालय, ट्रेनिंग अँड प्लेसमेंट कक्ष, विद्यार्थी विकास विभाग, कॅन्टींग, क्रीडांगण,विद्यार्थी स्वच्छता गृह आदी विभागाची माहिती घेतली.त्याचबरोबर विद्यार्थ्यांशी व पालकांशी संवाद देखील साधला. महाविद्यालयातील संगणक लॅबचा होत असलेला वापर, विद्यार्थ्यांना मिळत असलेल्या सेवा सुविधा, रेकॉर्ड ठेवण्याची पद्धत, ऑडिट रिपोर्टची माहिती घेत आवश्यक त्या ठिकाणी भेटी देऊन सर्व उपक्रमांची माहिती जाणून घेतली. यावेळी कॉलेज ट्रस्टचे अध्यक्ष भरतभाई माळी, उपाध्यक्ष रोहित माळी, कोषाध्यक्ष लक्ष्मण माळी, सदस्य अनिल मगरे,उखा पिंपरे, अरविंद माळी, विलास सूर्यवंशी, गोविंद पाटील,नंदूगिर गोसावी, दत्तात्रय पाटील, सुनील कर्णकार, मुकेश कलाल,चेतनकुमार पवार हे आवर्जून उपस्थित होते. सर्व संचालक मंडळाच्या वतीने भरतभाई माळी यांनी शाल व पुष्पगुच्छ देऊन समितीच्या अध्यक्षांसह समन्वयक सदस्य तसेंच सदस्य यांचे या ठिकाणी स्वागत करण्यात आले. यावेळी समाजकार्य महाविद्यालयाच्या प्राचार्य उषा वसावे,आर्ट्स व कॉमर्स कॉलेज चे प्राचार्य हेमंत दलाल यांच्यासह सर्व प्राध्यापक या ठिकाणी उपस्थित होते. शेवटी समितीचे अध्यक्ष सी. पी. सिंग तसेच समन्वयक सदस्य व सदस्य यांनी कॉलेज ट्रस्टच्या कामकाजाबद्दल समाधान व्यक्त केले आणि आपल्या मनोगतातून त्यांनी सांगितले की, तळोदा तालुका हा दुर्गम भागात असताना सुद्धा या ठिकाणी एवढ्या चांगल्या प्रकारे कॉलेज ट्रस्ट व समाजकार्य महाविद्यालयाचे कामकाज सुरू आहे आणि या ठिकाणी असलेल्या सर्व सोयी सुविधा पाहता विद्यार्थ्यांना कुठल्याही प्रकारची शिक्षणाबाबत अडचण येऊ शकत नाही. त्यामुळे आम्ही या महाविद्यालयाच्या कामकाजाबद्दल समाधानी असल्याचे गौर उद्गार त्यांनी यावेळी काढले.