देवलाल आकोदे सर्कल प्रतिनिधी हसनाबाद
भोकरदन तालुक्यातील हसनाबाद येथील श्री गणपती इंग्लिश स्कुल हसनाबाद या शाळेत १७ सप्टेबर या दिवशी मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त ध्वजावरोहनासह विविध कार्यक्रमांचे आयोजण करण्यात आले होते.ध्वजावरोहन लक्ष्मण म्हस्के चेअरमन यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी सुञसंचलनासाठी माणसी पठाडे व अथर्व राठी यांनी सुंदर तयारी करत कार्यक्रमास शोभा आणली.विद्यार्थ्यांच्या इंग्रजी भाषणाबरोबरच”इको फ्रेंडली गणपती मेकींग”स्पर्धेत क्रमांक आलेले माता पालकांसह विद्यार्थ्यांना बक्षिसे देण्यात आली.त्याचबरोबर जीईएस च्या प्रसिध्द झालेल्या (न्युज डिस्प्ले बोर्ड) बातमी फलकाचे अनावरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.विद्यार्थ्यांनी शाळेत बसविलेल्या इको फ्रेंडली श्री गणेशाचे विसर्जन सन्मानपूर्वक शाळेत ठेवण्यात आलेल्या बकेटमधे करण्यात आले.या ठिकाणी शाळेत महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.विद्यार्थ्यांनी आनंदाने महाप्रसादाचा आस्वाद घेत आनंद व्यक्त केला.यावेळी विद्यार्थ्यांनी ग्रामीण संस्कृतीचे दर्शन घडवत”जीवन करी जीवीत्वा अन्न हे पुर्ण ब्रम्ह”हा श्लोक घेतला व गणपती बाप्पा मोरया! पुढच्या वर्षी लवकर या !असा एकच जल्लोश,जयघोष करत गणपती बाप्पांना प्रेमाचा निरोप देण्यात आला.हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जीईएस शाळेचे मिसाळ सर व मॅडम यांच्यासह संपूर्ण शिक्षक,शिक्षका व शिक्षकेतर कर्मचारी यांनी मेहनत घेतली तसेच विद्यार्थ्यांबरोबर आनंद उत्सव साजरा केला.(फोटो -देवलाल आकोदे हसनाबाद)