देवलाल आकोदे सर्कल प्रतिनिधी हसनाबाद
भोकरदन शहरातील इंडियन पब्लिक स्कूल येथे मराठवाडा मुक्ती संग्राम दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.याप्रसंगी प्रमुख पाहुणे शिवनाथ गायकवाड यांच्या उपस्थितीत श्री.प्रमोद केनेकर सर यांच्याशुभहस्ते ध्वजारोहण संपन्न होऊन देशभक्तांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.वेदिका वाढेकर व प्रणव लोखंडे या विद्यार्थ्यांनी आपल्या आक्रमक शैलीमध्ये मराठवाडा मुक्ती संग्राम चळवळी विषयावर भाषण करून कार्यक्रमाची शोभा वाढवली व विद्यार्थ्यांनी देशभक्ती पर आधारित गीते सादर करून उपस्थितांची मने जिंकली.त्यानंतर शाळेचे मुख्याध्यापक विलास चंडोल यांनी मराठवाडा मुक्तीसंग्राम दिना विषयी उपस्थित व विद्यार्थ्यांना सखोल असे मार्गदर्शन केले.या कार्यक्रमासाठी किशोर फुके,शिवनाथ गायकवाड,विष्णू बरडे,सुधाकर पाबळे आदी पालक उपस्थित राहुन कार्यक्रमाची शोभा वाढवली.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रमोद केनेकर यांनी तर आभार प्रदर्शन विनोद गावंडे यांनी केले. कार्यक्रम यशस्वीते साठी सर्व शिक्षकवर्ग यांनी मोलाचे योगदान देऊन कार्यक्रम संपन्न केला.(फोटो-देवलाल आकोदे,हसनाबाद)


