कैलास शेंडे जिल्हा प्रतिनिधी नंदुरबार
नंदुरबार: तळोदा तालुक्यातील गेल्या दोन महिन्यापासून बिबट्यांच्या मुक्त संचार मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. त्यामुळे तालुक्यात घबराटीचे वातावरण पसरले आहे. दरम्यान मागील एक महिन्यावर ह्याच शिवरात आजी व नातवाला बिबट्याने ठार केले होते. त्यामुळे परिसरात शोककळा पसरली होती. त्यामुळे ह्या शिवारात नरभक्ष बिबट्यांची दहशत वाढली आहे. घटनेची गांभीर्य लक्षात घेता वनविभागाने काझीपुर शिवारात गस्त वाढवून पिंजरे ठेवले होते. दरम्यान तीन बिबटे जेरबंद करण्यात वनविभागाला यश आले होते. परंतु आणखी बिबटे असल्याचे ग्रामस्थ व शेतकऱ्यांचे म्हणणे असल्याने पुन्हा पिंजरे लावण्यात आले होते. दरम्यान साधारण पंधरा दिवस नंतर पुन्हा मंगळवार रोजी दिगंबर आत्माराम सुर्यवंशी यांच्या शेतातून बिबट्याला जेरबंद करण्यात वनविभागाला यश आले आहे. तरी देखील अद्याप दोन बिबट परिसरात मुक्तसंचार करीत असल्याचे शेतकरी, शेतमजूर व ग्रामस्थांचे म्हणणे असल्याचे सांगितले जात आहे.


