योगेश मेश्राम ग्रामीण प्रतिनिधी चिमूर
सेमाना विद्या व वनविकास प्रशिक्षण मंडळ गडचिरोली द्वारा संचालित ग्रामगीता महाविद्यालय चिमूरच्या नऊ विद्यार्थ्यांनी वर्ष 2023-24 मध्ये स्पर्धा परीक्षेत चमकदार कामगिरी केली व समाजाला दाखवून दिले की ग्रामीण भागातील विद्यार्थीही स्पर्धेच्या युगामध्ये मागे नाही. रागिणी कामडी (टॅक्स इन्स्पेक्टर, जीएसटी ऑफिस, माझगाव मुंबई), शुभम डाखोरे (शिक्षक, जिल्हा परिषद, नांदेड), रुचिका डांगे (वनरक्षक, फॉरेस्ट ऑफिस, चंद्रपूर), अंकित भारशंकर (कॉन्स्टेबल, केन्द्रीय औद्योगिक सुरक्षा बल), हर्षल चौके (मोटर मेक्यानिक, तिबेटीयन बॉर्डर फोर्स), अकिब शेख (कॉन्स्टेबल, पोलीस स्टेशन, नागपूर), लक्ष्मी पचारे (कॉन्स्टेबल, पोलीस स्टेशन, मुंबई), मयूर इंदुरकर (आरोग्य सेवक, आरोग्य विभाग, चंद्रपूर) व राकेश मलके (SKT, सामान्य राखीव अभियांत्रिकी बल) असे यशस्वी विद्यार्थ्यांचे नावे असून सर्व विद्यार्थ्यांचे महाविद्यालयाचे कार्यकारी प्राचार्य डॉ. हुमेश आनंदे, तसेच प्राद्यापक डॉ. संदीप सातव, प्रा. संदीप मेश्राम, डॉ. वरदा खटी, डॉ. युवराज बोधे, प्रा. नागेश ढोरे, डॉ. निलेश ठवकर, डॉ. बिजनकुमार शील, डॉ. मृणाल वराडे, डॉ. सुमेध वावरे, डॉ. प्रणाली टेंभुर्णे, प्रा. समिरकुमार भेलावे, प्रा. प्रज्ञा खोब्रागडे, प्रा. विवेक माणिक, प्रा. रोहित चांदेकर, प्रा. सरताज शेख तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी या सर्वांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.