निसर्गपूजक बहुद्देशीय संस्थेकडून बैलसजावट स्पर्धेचे आयोजन.
संतोष पोटपिल्लेवार तालुका प्रतिनिधी, घाटंजी
घाटंजी :अनेक गावात तान्हापोळा हा सन साजरा केला जातो महाराष्ट्रात ज्या प्रकारे बैल पोळा साजरा केला जातो अगदी त्याचप्रमाणे पोळ्याच्या पाडव्याला तान्हापोळा साजरा करण्याची परंपराआहे बैलाचे महत्व लहान मुलाच्या देखील लक्षात यावे या अनुषंगाने घाटंजी तालुक्यातील चोरांबा येते आज दिनांक ३/८/२०२४ रोजी सकाळी ९ वाजता निसर्ग पूजक बहुउदेशीय संस्था चोरांबा यांच्या वतीने तान्हापोळ्यात बैलसजावट स्पर्धाचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये लहान मुलांनी सहभाग नोदवून आपल्या बैल कलेचे सजावट करून सादरीकरण करण्यात आले सकाळी ९ वाजता ही स्पर्धा मारोती मंदिर परिसरात लहान मुले विविध प्रकारच्या बैलासह वेगवेगळ्या वेषभूषेत सहभागी झाली होते मात्र आकर्षक बैलाचे निरक्षण करून पाच स्पर्धकाचे निवड कारण्यात आली ज्यामध्ये पहिले बक्षीस रुद्रा किनाके, दुसरा बक्षीस सोहम तोडसाम, तिसरा बक्षीस आयुष्य सोयाम, चौथा बक्षीस राघवी तोडसाम,पाचवा बक्षीस,अंशुमन कलाद्रे आणि असे एकूण 51 बैल जोड्या सहभागी झाल्या होत्या स्पर्धेत सहभागी या सर्व मुलांना बक्षीस पण देण्यात आले तसेच स्पर्धेमध्ये बक्षीसपात्र पाच जोड्यांची निवड करण्यात आली ज्यामध्ये रुद्रा, सोहम, आयुष, राघवी, अंशुमन प्रशांत कलाद्रे विजेत्यांना प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते बक्षीस देऊन गौरविण्यात आले यावेळी निसर्ग पूजक संस्थेचे अध्यक्ष श्री,बंडू तोडसाम व सरपंच, सौ.ज्योती रंदये, गावातील प्रमुख मारजी तोडसाम, भगतसिंग नानकसिंग ढालवाले, वाल्मीक उरकुडे विजय रंदये,उत्तम शेडमाके, तसेच निसर्ग पूजक बहुउदेशीय संस्था चोरांबा या संस्थेंचे उपाध्यक्ष सचिव सदस्य गण व गावातील प्रमुख अजय पडलवार, पवन रंदये, ,मारोती तोडसाम,जयराम तोडसाम,अमरजीत ढालवाले,गुरुदेव तोडसाम दर्शन रंदये,वेदांत तोडसाम या तान्हा पोळ्याचे सूत्रसंचालन व आभार सुवर्णसिग ढालवाले यांनी केले, सोबत असलेल्या बैल बद्दल कुतन्यता व्यक्त करण्याचा दिवस पोळा असतो त्यास पद्धतीने लहान मुलामध्ये सुद्धा हे संस्कार राहावे यासाठीच,निसर्ग पूजक बहुउदेशीय संस्था चोरांबा मागील वर्षापासून असा उपक्रम राबवितात हे उल्लेखनीय आहे.