स्वरूप गिरमकर ग्रामीण प्रतिनिधी शिरूर
शिरूर : राजर्षी शाहू प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य, दक्ष मराठी पत्रकार संघ व जागृत शोध वृत्तपत्र यांनी ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले स्मारक गंज पेठ पुणे येथे आयोजित केलेला पुरस्कार सोहळा उत्साहात संपन्न झाला यामध्ये सामाजिक शैक्षणिक राजकीय व्यावसायिक कला क्रीडा वैद्यकीय क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या क्षेत्रातील नामवंताना महाराष्ट्र आयडॉल पुरस्कार 2024 देऊन सन्मानित करण्यात आले.यावेळी उरळगावचे सुपुत्र ग्रामविकास अधिकारी राजेंद्र सात्रस यांना आदर्श ग्रामविकास अधिकारी यांनी केलेल्या उल्लेखनीय कामाबद्दल आयडॉल पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.राजेंद्र सात्रस यांनी विविध ठिकाणी काम करत असताना गावांमध्ये विविध विकासकामे, वंचित, पीडित, गरिबांना आर्थिकदृष्ट्या सक्षम केले. गोरगरिबांना घरकुल वाटप, विधवा महिलांना पेन्शन, बचत गटाच्या माध्यमातून अनेक महिलांना रोजगार उपलब्ध करून दिला.तसेच कोरोना या महाभयंकर आजारावरती नियंत्रण मिळवण्यासाठी आरोग्य अधिकारी यांच्याबरोबर सतत संपर्क ठेवून सुरक्षेच्या दृष्टीने ठोस पावले उचलली.त्यावेळी किट चे वाटप,आरोग्य शिबिरे, स्मशानभूमी सुशोभीकरण वृक्षारोपण अशी विविध विकास कामे केली.त्यांच्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत त्यांना आदर्श ग्रामविकास अधिकारी आयडॉल पुरस्कार ‘अप्पी आमची कलेक्टर’ फेम अभिनेत्री शिवानी नाईक दक्ष मराठी पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष व जागृत शोध चे संपादक भगवान श्रीमंदिलकर, उपसंपादक आदित्य श्रीमंदिंलकर, ॲड. सतीश कांबळे, शोभाताई बल्लाळ बाळकृष्ण नेहरूकर, संभाजी जामदार एकनाथ कोरे इत्यादी मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आला.यावेळी उपस्थित सौ. सुरेखा राजेंद्र सात्रस मा आदर्श सरपंच उरळगाव व असंख्य नागरिक उपस्थित होते.