दिनानाथ पाटील तालुका प्रतिनिधी शहादा
शहादा : नंदुरबार येथील प्रेसफोटोग्राफर नितीन पाटील यांना यवतमाळ येथे झालेल्या राज्यस्तरीय फोटोग्राफी स्पर्धेत पारितोषिक मिळाले. यवतमाळ येथील कॉटन सिटी फोटोग्राफर व व्हिडिओग्राफर सामाजिक संस्थेमार्फत निसर्ग या विषयावर राज्यस्तरीय फोटोग्राफी स्पर्धा घेण्यात आली होती. त्यात येथील प्रेस फोटोग्राफर यांनी स्पर्धेत पाठविलेल्या फुलावरील दवबिंदूंचा फोटोला उत्तेजनार्थ पारितोषिक मिळाले. या स्पर्धेमध्ये राज्यभरातील ४०० फोटो स्पर्धेत फोटोग्राफरांनी पाठवले होते. प्रेस फोटोग्राफर नितीन पाटील यांना यापूर्वी पुणे, मुंबई, नागपूर, चंद्रपूर, नाशिक, अमरावती, जळगाव, भुसावळ, धुळे, धडगाव, तळोदा येथे घेण्यात आलेल्या विविध विषयांवरील फोटोग्राफी स्पर्धांमध्ये पारितोषिक मिळाले आहेत. यासोबत फोटोग्राफी क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल पुरस्कार मिळाले आहेत. त्यांनी विविध विषयांवर फोटोग्राफी प्रदर्शन भरविले आहे. सारंगखेडा येथे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते त्यांनी भरविलेल्या फोटो प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले होते. त्यांना यवतमाळ येथे मिळालेल्या पारितोषिक बद्दल विविध स्तरावरील सामाजिक संस्था व मित्रपरिवारांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.