सतिश गवई तालुका प्रतिनिधी उरण.
उरण विधानसभा मतदार संघातुन काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत यांना उमेदवारी द्यावी अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या कडे झोपडपट्टी व जिंर्ण चाळी विकास सेलचे रायगड जिल्हाध्यक्ष दीपक पाटील यांनी केली आहे, आगामी होणाऱ्या विधानसभेच्या निवडणूका जवळ आल्याने सर्वच पक्षांनी मोर्चे बांधणी चालू केली असून या मतदार संघावार काँग्रेसने दावा ठोकला आहे,असून हा मतदार संघ कॉग्रेसला मिळावा यासाठी प्रदेशाध्यक्ष यांच्याकडे मागणी केली आहे उरण विधानसभा मतदार संघ हा ठाकरे गटाकडे जाण्याची दाट शक्यता असल्याने महाविकास आघाडीत हा मतदार संघ कॉग्रेसला मिळावा यासाठी काँग्रेसने जोरदार हालचाली सुरु आहेत,कॉग्रेसचे जिल्हाध्यक्ष कामगार नेते महेंद्र घरत यांचा या मतदार संघावर मजबूत पकड असून दांडगा जनसंपर्क आहे, त्यांनी कॉग्रेसची संघटना वाढीसाठी जोरदार प्रयत्न चालू आहेत,या उरण मतदार संघातून कॉग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत यांना उमेदवारी मिळावी यासाठी झोपडपट्टी व जीर्ण चाळी विकास सेलचे रायगड जिल्हाध्यक्ष दीपक शंकर पाटील यांनी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे,