अकोला जिल्ह्यातील प्रकारघरकुलचे हप्ते मिळेना, संबंधितांचे दुर्लक्ष, लाभार्थी वैतागले
करामत शाह तालुका प्रतिनिधी अकोला
सुकळी : अकोला जिल्ह्यातील पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या गाव सुकळी नंदापुर व आगर येथील घरकुलाचे हप्ते मिळत नसल्याने दिव्यांग विधवा व गरीब लाभार्थी लाभार्थी वैतागले आहेत. अनेक लाभार्थ्याचा संसार उघड्यावर आला आहे. राज्य सरकारकडून बोलबाला केला जातो की भरभरून निधी दिला जाईल परंतु असं न होता निधी नसल्याने अकोला जिल्हा मोदी आवास योजनेतील लाभार्थीचे चार महिन्यांपासून घरकुलाचे कामे रखडली आहेत. सध्या पावसाळा सुरू असल्याने अनेक लाभार्थ्यांचे कुटुंब रस्त्यावर आले आहे. 90% टक्के काम झाले असून तरी सुद्धा घरकुलाचा दुसरा टप्पा मिळत नसल्याने लाभार्थी वैतागले आहेत सावकाराकडून व्याजाने कर्ज काढून घराचे बांधकाम केले परंतु संबंधित विभागाच्या दुर्लक्ष मुळे शून्य नियोजनामुळे लाभार्थ्याचे अनुदान रखडले आहेत . संबंधितांनी त्वरित दखल घेऊन उर्वरित घरकुलाचे हप्ते अदा करण्यात यावे अशी मागणी लाभार्थ्याकडून होत आहे.प्रतिक्रियाअकोला जिल्ह्यातील प्रकार, निधी नसल्याने घरकुलाचे हप्ते रखडले, संबंधितांनी त्वरित दखल घेऊन उर्वरित घरकुलाचे हप्ते अदा करण्यात यावे. अन्यथा अकोला पंचायत समिती आवारात ठिय्या आंदोलन करण्यात येईल वैभव पाटील सारसे सदस्यग्रामपंचायत सुकळी नंदापुर व प्रहार सेवक अकोला जिल्हा