मोहन कांबळे ग्रामीण प्रतिनिधी मालेगांव
वाशिम :सैन्य दलात भरती होऊन देश सेवा करण्याची अनेकांची स्वप्ने असतात.पण हे स्वप्न प्रत्येकाचांच पूर्ण होत नाही.सैनिक सीमेवर जीवाची बाजी लावून देशाचं सर्वक्षण करतात.पण हा सैनिक जेव्हा देश सेवा करून घरी परततो तेव्हा प्रत्येकाचं उर अभिमानाने भरून येतं.असाच क्षन वाशिम जिल्ह्यातील मालेगांव तालुक्यातील राजुरा येथे पाहायला मिळाला.१७ वर्ष देशाचं रक्षण करून सुखरूप घरी परतणाऱ्या एका जवानाच अख्या गवांने स्वागत केलं.रवींद्र राजूरकर यांनी १७ वर्ष सीमेवर देशसेवा केली.सेवानिवृत्त होऊन गावी आल्यावर ढोल ताशा वाजवून फटाक्याच्या अतिश बाजी ने पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.गावातून मिरवणूक काढण्यात आली.राजुरा येथील ह भ प विठ्ठल महाराज सोनुने यांनी सेवानिवृत्त रवींद्र राजूरकर यांच्या जीवनावर प्रकाश टाकला रवींद्र राजूरकर हे २००७ मध्ये भारतीय सैनेत दाखल झाले.त्यांनी १ ते ७ वी पर्यंत शिक्षण जिल्हा परिषदेच्या शाळेत राजुरा गावी पूर्ण केलं.पुढील शिक्षण ८ वी ते १२ वी तालुक्याच्या ठिकाणी ना. ना. मुंदडा येथे पूर्ण केलं . वयाच्या १८ व्या वर्षी ते सैन्यात दाखल झेले.स्वागतासाठी गावातील मनीष मोहळे,दैनिक लोकमत चे पत्रकार यशवंत हिवराळे ,शिवा खराटकर,वसंता कांबळे,ग्राम पं सदस्य मोहन कांबळे,ग्राम पं सदस्य गोपाल पातळे, ग्राम पं सदस्य सुरेश नागरे,प्रतीक राजूरकर ,किशोर घुगे,शुभम घुगे, गोपाल गोरे, गोपाल पातळे,लखन हिवराळे,रामदास सराफ,,दीपक सोनुने,विकास दराडे,रोहन गोरे,अभिषेक भेंडेकर,राजू ढोबळे,ऋषिकेश आढव ,विशाल सोनुने,विशाल कुटास्कर,अशोक ढाकणे,महादेव हिवराळे,आश्विन शिंदे,सतीश डीघोळे,दिलीप डोईफोडे, व संपूर्ण राजूरकर कुटुंब व सर्व गावकरी मंडळी च्या वतीने जल्लोषात स्वागत करण्यात आले.सेवानिवृत्त रवींद्र राजूरकर यांनी उपस्थित गावकरी मंडळी चे आभार मानून युवा वर्गाला त्यांनी आव्हान केले.ज्या तुरूनाला भारतीय सैनेत भरती व्हायचे आहे. तो गरीब असो या कोणी पण असो त्याला मी सर्व प्रकारची मदत करायला तयार आहे.असे आव्हान उपस्थित युवा वर्गाला केले.कुटुंबाच्या वतीने गोड भरवून त्यांचं औक्षण करण्यात आल . १७ वर्ष देशसेवा करून सुखरूप गावी आल्याने सर्वांच्या चाहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता.


