मारोती सुर्यवंशी शहर प्रतिनिधी नरसी
नरसी: नरसी शहर व परिसरात सर्वत्र बैल पोळा सण मनात,व एका डोळ्यात दु:खाचे अश्रू तर दुसऱ्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले अशा अवस्थेत नांदेड जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हा उपाध्यक्ष संभाजी पा. भिलवंडे यांनी परंपरागत पद्धतीने चालत आलेला बैलं पोळा सण साजरा करण्यात आला कारण गेल्या पाच दिवसांपासून वरुण राजा मराठवाडा, विदर्भ, कोकणासह महाराष्ट्रात मुसळधार पावसाने झोडपले त्यामुळे नरसी शहर व परिसरात डौलाने डोलणारी पिकं अक्षरशः भुईसपाट झाली, घरांची पडझड झालेली त्यामुळे अचानक उद्भवलेल्या या आस्मानी संकटात सापडलेल्या शेतकरी राजा पुरता हवालदिल झाला तरीही नांदेड जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हा उपाध्यक्ष संभाजी भिलवंडे यांच्या निवासस्थानी गावकरी मित्र व परीवार मिळून सर्व प्रतिकूल परिस्थितीला मागे सारून आनंदाने बैल पोळा साजरा केला.


