स्वरूप गिरमकर ग्रामीण प्रतिनिधी शिरूर
शिरूर : आरोग्य हे बाजारात विकत मिळत नसल्याने आजार होण्यापेक्षा त्यास प्रतिबंध करणे ही काळाची गरज आहे. त्यासाठी प्रत्येकाने आरोग्य साक्षर व सजग होणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन पुणे जिल्हा जेष्ठ नागरिक संघांचे अध्यक्ष नामदेव जयवंतराव गिरमकर यांनी केले.उरळगाव येथे जेष्ठ नागरिक संघ वर्धापनदिन तसेच कार्यसम्राट आमदार अशोकबापू पवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून जेष्ठ नागरिकांचा सन्मान करण्यात आला उरळगावमध्ये ज्येष्ठ नागरिक भवनमध्ये हा कार्यक्रम पार पडला. या वेळी जेष्ठ नागरिक तुकाराम गिरमकर सर म्हणाले, सध्या अन्न, हवा व पाणी प्रदूषित झाल्यामुळे आपले आयुर्मान घटत चालले आहे. मानसिक ताणतणाव, फास्ट फूड संस्कृती, रासायनिक खतांचा वापर वाढल्याने अकाली मृत्यू होण्याचे प्रमाण वाढत आहे.त्यासाठी आदर्श आरोग्य दिनचर्या तयार करून समाजाचे आधारस्तंभ असलेल्या ज्येष्ठ नागरिकांनी आरोग्य आचारसंहितेचे तंतोतंत पालन करणे ही काळाची गरज आहे.कार्यक्रमाचे स्वागत तंटामुक्ती अध्यक्ष तुकाराम गिरमकर यांनी केले तर प्रास्ताविक अध्यक्ष नामदेव गिरमकर यांनी केले. सुत्रसंचालन जेष्ठ नागरिक संघाचे श्यामकांत बांडे यांनी केले.यावेळी खरेदी विक्री संघांचे माजी संचालक जयवंतराव गिरमकर,पांडुरंग जेष्ठ नागरिक संघांचे अध्यक्ष पोपटदादा गिरमकर, उपाध्यक्ष श्यामकांत बांडे, संतोष मुथा, पंढरीनाथ सात्रस, आनंद होलगुंडे सर, जन्याबापू काळे, भिवाजी दिघे, विठ्ठल बांडे, महादेव पोपळघट, सुभाष जसाभाटी यांच्यासह जेष्ठ नागरिक संघाचे सर्व सदस्य उपस्थित होते.