शिवाजी शिंदे जिल्हा प्रतिनिधी परभणी
सेलू : दि. 23 रोजी श्रीराम प्रतिष्ठान संचलित एल. के. आर. रोडगे प्रिन्स इंग्लिश स्कूल सेलू येथे एक दिवसीय अभिनय व नृत्य मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले.कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. संजय रोडगे, प्रमुख पाहुणे परभणी जिल्ह्यातील प्रसिद्ध अभिनयकार मा.विनोद डावरे व मा. अतुल वाघळकर आणि सुप्रसिद्ध शास्त्रीय भरतनाट्यम नृत्यकार ऐश्वर्या डावरे, प्राचार्य कार्तिक रत्नाला, प्राचार्या सौ. प्रगती क्षीरसागर व सर्व शिक्षकवृंद उपस्थित होते.श्रीराम प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. संजय रोडगे यांच्या संकल्प नेतून कला क्षेत्रात आवड असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हे शिबिर आयोजित करण्यात आले .नृत्य, नाट्य, चित्रपट यां सा रख्या प्रयोगीय कलां मध्ये नटाने आशय प्रकटनासाठी कृती, आविर्भाव, भाषण व वेशभूषा या साधनां द्वारा केलेली भूमिकेची भावाभिव्यक्ती म्हणजे अभिनय.अभिनयामध्ये कौशल्यांची विस्तृत श्रेणी समाविष्ट असते, ज्यामध्ये चांगली विकसित कल्पना शक्ती, भावनिक सुविधा, शारीरिक अभिव्यक्ती, स्वर प्रक्षेपण, बोलण्याची स्पष्टता आणि नाटका चा अर्थ लावण्याची क्षमता यांचा समावेश होतो.