अरविंद बेंडगा तालुका प्रतिनिधी डहाणू
डहाणू :- गेले काही अनेक दिवसांपासून पालघर जिल्ह्यामध्ये पेसा 17 स वर्गातील पद भरती होत नाही यासाठी ठिकठिकाणी आंदोलन सुरू आहेत. तसेच नाशिक येथील गोल्फ क्लब मैदान या ठिकाणी राज्यातील 13 जिल्हा मधील सुशिक्षित तरुण तरुणी आंदोलनाला बसलेली आहेत पण या सर्वांची दखल प्रशासनाने घेतली नसल्यामुळे आज दि. 23 ऑगस्ट रोजी पालघर मध्ये पूर्ण बंद ठेवण्याचा निर्णय पालघर मधील सर्व संघटनांनी घेतला अनुसूचित पेसा क्षेत्रातील जे जे गाव आहेत या पूर्ण गावांमध्ये दळणवळण बंद ठेवण्याचा तसेच प्रशासकीय कार्यालय बंद ठेवण्यात आलेले होते. जिल्हातील बहुतेक तालुक्यात हजारो नागरिक उतरून आंदोलन करताना दिसून आलेत,या आंदोलनातून असा इशारा देणार आला की जो पर्यंत प्रशासन पेसा 17 स वर्गातील पद भरती होत नाही तो पर्यत हा अंदोलन असच चालू असणार अस सांगण्यात आले या वेळी पालघर जिल्हातील सामाजिक संस्था, राजकीय पुढारी, पालघर मधील 48 संघटना एकत्र एकवटल्याचे दिसून आले, पालघर जिल्ह्यातील सर्व प्रशासकीय कार्यालय बंद ठेवण्यात आले तसेच दळणवळण असणारा रस्ता हायवे हे रोखण्यात आले या आंदोलनातून प्रशासनाला इसारा देण्यात आलेला आहे की जोपर्यंत प्रशासन पेसा 17 स वर्गातील पदभरती करत नाही तोपर्यंत आमचे हे आंदोलन असेच सुरू असणार आहे.