योगेश मेश्राम ग्रामीण प्रतिनिधी चिमूर
महाराष्ट्र शासनाने शेतकऱ्यांसाठी सिंचनाची सोय उपलब्ध व्हावी म्हणून मागेल त्याला विहीर ही शंभर टक्के अनुदानावर तात्काळ योजना सुरू केली परंतु तालुक्यामध्ये बहुसंख्य शेतकऱ्यांना स्वखर्चातून किंवा कर्ज घेऊन बांधकाम करावे लागले परंतु अजूनही त्यांना कोणत्याही प्रकारचे अनुदान न मिळाल्याने तालुक्यातील शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत त्यामुळे शंकरपूर ग्रामपंचायत उपसरपंच यांनी गटविकास अधिकारी चिमूर यांना निवेदन देऊन आंदोलनाचा इशारा दिला आहे.ही योजना नरेगा मार्फत राबविली जात असून सिंचन विहीर ही वैयक्तिक राष्ट्रीय ग्रामीण हमी योजनेअंतर्गत असल्याने शासनाचा मुख्य उद्देश शेतकऱ्याचे उत्पन्न वाढावे हा आहे या योजनेअंतर्गत चिमूर तालुक्यात सुमारे 140 विहिरीचे बांधकाम माहे जानेवारी ते माहे जून या कालावधीत पूर्ण करण्यात आले.या योजनेचा मुख्य उद्देश शेतीला सिंचनाची सोय व्हावी गावातील मजुरांना गावातच काम मिळावे या उद्देशाने शेतकऱ्यांसाठी चार लाख रुपये किमतीची शंभर टक्के अनुदानावर सिंचन विहीर योजना शासनातर्फे सुरू आहे सिंचन विहिरीचे अनुदान सरळ बँक खात्यात शासनाकडून जमा केले जाते ही रक्कम जिल्हास्तर किंवा तालुका स्तरावर राहत नसून शासनाकडून विहिरीचे बांधकाम झाल्यानंतर मजुरीची रक्कम काहींच्या खात्यात जमा होत असते.परंतु चिमूर तालुक्यामध्ये कुशल मजुराच्या खात्यामध्ये रक्कम जमा झालेली नाही शेतकऱ्यांनी आपल्याकडील असलेली थोडीफार रक्कम व कर्ज घेऊन तसेच उधारी बांधकाम साहित्य विकत घेऊन शासनाचे अनुदान मिळेल या आशेने तालुक्यातील शेतकऱ्यांनी विहिरीचे बांधकाम पूर्ण केले परंतु ही अनुदानाची रक्कम आज पावेतो मिळाली नसल्याने तालुक्यातील शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत.सध्या खरिपाचा हंगाम सुरू असून शेतकऱ्यांना कापूस सोयाबीन तूर धान यासाठी खर्च करावा लागत आहे त्यामध्ये पिकाला खत देणे औषधी फवारणी करणे तण काढणे इत्यादीचा खर्च करणे शेतकऱ्यांना अत्यावश्यक झाले आहे .त्यामुळे तालुक्यातील शेतकरी या विहिरीचे अनुदान मिळेल व शेतीला खरीप हंगामात हातभार लागेल ही अपेक्षा ठेवून असतानाच प्रशासनाने मात्र शेतकऱ्यांचा अपेक्षाभंग केला आहे.त्यामुळे ही अनुदानाची रक्कम येत्या आठ दिवसात शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात यावी अन्यथा तालुक्यातील शेतकऱ्यांना घेऊन पंचायत समिती चिमूर समोर तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा निवेदनाद्वारे शंकरपूर ग्रामपंचायतचे उपसरपंच अशोक चौधरी यांनी गटविकास अधिकारी पंचायत समिती चिमूर यांना दिला आहे.