मारोती बारसागडे तालुका प्रतिनिधी चामोर्शी
चामोर्शी:-संत जगनाडे महाराज ऍग्रो प्रोड्युसर कंपनीच्या सभासद शेतकऱ्यांना मोफत खते व निविष्ठा वाटप कार्यक्रम दिनांक २० ऑगस्ट २०२४ रोज मंगळवारी संताजी क्रीडांगण प्रभाग क्रमांक तीन गोंडपुरा चामोर्शी येथे माजी खासदार तथा अनु.जनजाती मोर्चा चे अशोक नेते व प्रमुख पाहुणे यांच्या शुभहस्ते शेतकऱ्यांना मोफत खते वाटप करण्यात आले.या कार्यक्रमाच्या मचांवर प्रमुख पाहुने म्हणुन माजी.खासदार अशोक नेते, माजी आमदार डॉ.नामदेव उसेंडी, कृषी विभागाचे जिल्हा अधीक्षक मास्तोडी सर,भाजपा महिला आघाडी च्या प्रदेश चिटणीस सौ. रेखाताई डोळस,भाजपा नेत्या डॉ.चंदा कोडवते,भाजपा जिल्हा उपाध्यक्ष तथा मानवाधिकार संघटनेचे प्रदेशाध्यक्ष प्रणय खुणे,जिल्हा उपाध्यक्ष डॉ.भारत खटी,जेष्ठ नेते श्रावण सोनटक्के, प्रतिष्ठित नागरिक कविश्ववर आईंचवार, कृषी विभागाचे पी.पी. गजभिये, मंडळ कृषी अधिकारी बी.बी चापले,कृषी पर्यवेक्षक एच.डीयचवाडबी.एन.गायकवाडप्रशिल वालदे,सि.एच.जिरतकर उपस्थित होते.उपस्थित शेतकऱ्यांना माजी खासदार अशोक नेते,माजी आमदार डॉक्टर नामदेव उसेंडी,जिल्हा कृषी अधीक्षक बसवराज मास्तोळी,प्रदेश चिटणीस सौ.रेखाताई डोळस,सौ.डॉ. चंदाताई कोडवते,व कृषी अधिकारी यांनी मार्गदर्शन केले. केंद्र आणि राज्य सरकार तमाम शेतकऱ्यांच्या हितासाठी कटिबद्ध आहे.शेतकऱ्यांच्या अनेक योजना केंद्र व राज्य शासनाच्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दहा वर्षाच्या कार्यकाळात शेतकऱ्यांना अनेक योजना कार्यान्वित केले आहेत.आपल्या जिल्ह्यात यावेळी अतिवृष्टीमुळे व सततच्या पावसाने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले यात हवालदिल झाला असुन अशावेळी शेतकऱ्यांना दिलासा हातभार देण्यासाठी यावेळी आशिष पिपरे यांनी पुढाकार घेऊन चामोर्शी येथे मोफत खत वाटपाचा कार्यक्रम आयोजित केला गेला अनेक शेतकरी या खत वाटपात उपस्थित आहेत.अशा कार्यक्रमाची स्तुती करतो तसेच शेतकऱ्यांनी खत घेऊन परिपूर्ण लाभ घ्यावा असे अवाहन करत केंद्र वराज्य सरकार शेतकऱ्यांच्या हिताचे व शेतकऱ्यांच्या पाठीशी आहेत असे प्रतिपादन या खत वाटपाच्या कार्यक्रमाप्रसंगी मा.खा.नेते यांनी केले.या प्रसंगी संत जगनाडे महाराज ऍग्रो प्रोडूसर कंपनीचे सभासद तसेच गावातील इतर शेतकरी हे सुद्धा मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमात तालुका आरोग्य अधिकारी यांच्या वतीने शुगर व उच्च रक्तदाब तपासणी करण्यात आले व शेतकऱ्यांना मोफत आरोग्य तपासणी करण्यात आले.या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कंपनीचे अध्यक्षा तथा नगरसेविका सौ.सोनाली पिपरे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा नगरसेवक आशिष पिपरे कंपनीचे संचालक तुळशीदास नैताम.रमेश अधिकारी उमाजी वासेकर.भैय्याजी धोडरे. जिवन पिपरे .शंकर वासेकर. श्रीधर पेशट्टीवार व पदाधिकारी यांनी अथक प्रयत्न केले.


