जलील शेख ,तालुका प्रतिनिधी, पाथरी
आज दिनांक-20/08/2024 रोजी पाथरी तालुकास्तरीय बुद्धिबळ स्पर्धा कै.स.गो.नखाते माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय देवनांद्रा येथे संपन्न कार्यक्रमाचे उद्घाटक ज्येष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी मुकेश राठोड, कार्यक्रमाचे अध्यक्ष भाऊसाहेब होगे मुख्याध्यापक कै.स.गो. नखाते माध्यमिक विद्यालय देवनांद्रा, प्रमुख पाहुणे विष्णू भिसे पर्यवेक्षक, अनुरथ काळे, शंकर धावरे याप्रसंगी ज्येष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी पंचायत समिती पाथरी मुकेश राठोड सर यांनी खेळाडूंना खेळाचे महत्व सांगत असताना जीवनामध्ये खेळ हा अविभाज्य घटक आहे. त्यामुळेच माणूस आनंदी आणि सुदृढ शरीरयष्ठी कमावून चांगले जीवन जगू शकतो म्हणून कुठलातरी खेळ खेळलाच पाहिजे. म्हणून विद्यार्थ्यांनी अभ्यासाबरोबर खेळही खेळला पाहिजे. तालुकास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेमध्ये एकूण 14 वर्षे वयोगट 17 वर्षे वयोगट 19 वर्षे वयोगट मुले आणि मुली एकूण 80.खेळाडूंनी सहभाग नोंदवला होता.14 वर्षा आतील मुले कृष्णा आमले, युवराज सुपेकर, सुजल लाडाने, पार्थ बिरादार, आणि गणेश धोपटे 14 वर्ष वयोगटात मुली संस्कृती चट्टे, साक्षी चाफाकानडे, सानिया बागवान, आविधा मैद, वेदिका गोंगे17 वर्षातील मुले शिवराज रोडे, भावेश गंगावणे, गोविंद राज पवार, श्रेयस रणदिवे, आणि पृथ्वीराज चव्हाण तर मुलींमध्ये ज्ञानेश्वरी बागल, अक्षरा पाने, प्रतीक्षा आचार्य, राधा देशमुख, आणि साक्षी साळवे*19 वर्षातील मुलांमध्ये सुदर्शन गणेश मगर वरील विजेत्या खेळाडूंचे अभिनंदन ज्येष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी पंचायत समिती पाथरी मुकेश राठोड, देवनांद्रा शाळेचे मुख्याध्यापक भाऊसाहेब होगे, विष्णू भिसे, अनुराधा काळे, महेश मोहकरे, सिद्धार्थ वाघमारे , सुरेश लहाने, सौ. कचवे मॅडम ,वांगीकर एम.आर.,मिसे एम.एस., शंकर धावारे, अरविंद गजमल, रणधीर सोळंके आदींनी केले.पंच म्हणून वांगीकर एम.आर. अरविंद गजमल, मुळे सर यांनी काम पाहिले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक तालुका क्रीडा संयोजक तुकाराम शेळके यांनी केले तर सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन रणधीर सोळंके यांनी केले.