गजानन वानोळे ग्रामीण प्रतिनिधी किनवट
किनवट तालुक्यातील इस्लापूर येथील भारतीय स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये लाडक्या बहिणीचे पैसे न पडल्याने इस्लापूर सर्कल मधील मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेसाठी पात्र असलेल्या महिलांची बँकेत फार मोठ्या प्रमाणात खात्याचे आधार लिंक व केवायसी करण्यासाठी प्रचंड गर्दी करताना दिसून येत आहेत. मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेला महिलांनी उदंड प्रतिसाद दिला आहे.जुलै व ऑगस्ट महिन्याचे तीन हजार रुपये महिलांच्या खात्यात जमा करण्यात आले . मात्र अजूनही काही महिलांचे पैसे मिळालेले नाही. कारण महिलांचे बँक खाते आधार सोबत लिंक नाही केवायसी झालेल नाही त्यामुळे हजारो महिला रोज बँकेत जाऊन केवायसी व आधार लिंक करण्यासाठी रांगा लावत आहे. रक्षा बंधनाच्या पुर्वी बहिणीच्या खात्यात पैसे जमा होणार असा शब्द सरकारने दिला मात्र ऐन वेळी रक्षाबंधनाला बहिण बँकेच्या बाहेर उभ्या असलेल्या दिसून येत आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेचे पैसे न आल्याने खात्याला केवायसी व आधार लिंक करण्यासाठी लाडक्या बहिणीची तारांबळ होताना दिसून येत आहे.











