संजय शिंदे ग्रामीण प्रतिनिधी इंदापूर
सोनाई प्रतिष्ठान च्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळ्याच्या पूर्वतयारीला गती आली असून विविध समित्या नेमून जबाबदार पदाधिकाऱ्यांवर त्यांची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. हा सोहळा २३ ऑगस्टला सायंकाळी गोरज मुहूर्तीवर होणार आहे. अजूनही गरजू वधू-वरांना नोंदणी करण्यासाठी संयोजकांनी आवाहन केले आहे. गोरज मुहूर्तावर होणार असलेला हा सोहळा इंदापूर शहरातील वाघ पॅलेसच्या मैदानावर होणार आहे. नुकतीच या सोहळ्यात कार्यरत असणाऱ्या कार्यकर्त्यांची बैठक झाली. या बैठकीला सोनाई उद्योग समूहाचे सर्वेसवी दशरथदादा माने व पुणे जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम सभापती प्रवीण माने यांनी मार्गदर्शन केले. सामूहिक विवाहांची गरज असणारे लोक मोठ्या संख्येने आहेत. पण त्यांच्यापर्यंत या विवाह सोहळ्यांची माहिती पोचलेली नाही. तसेच ज्यांना माहिती आहे त्यांच्या मनात या विवाह सोहळ्याविषयी बरेच गैरसमज आहेत. तेव्हा हा समाजघटक नेमका हेरून त्यांच्यापर्यंत वस्तुनिष्ठ माहिती पोचविली पाहिजे, याचा समाजातील प्रत्येक घटकातील समुहाला लाभ २३ ऑगस्टला पार पडणार विवाह सोहळा मिळाला पाहीजे. असे प्रवीण माने यांनी केले. सोनाई प्रतिष्ठानचा सामूहिक विवाह सोहळा हा महाराष्ट्रात आदर्श सोहळा समजला जातो. त्यामुळे या समित्यांवर काम करणाऱ्या कार्यकर्त्यांनी कार्यक्रम कसा अधिकात अधिक नेटका कसा होईल याचा विचार करावा, सर्वी सहकार्य केल्याने कार्यक्रम व्यवस्थित पार पडेल तरी सर्वांनी सहकार्य करावे असे आवाहन प्रवीण माने यांनी केले.