संतोष पोटपिल्लेवार तालुका प्रतिनिधी, घाटंजी
घाटंजी:- दि.१८ ऑगस्ट २०२४ रविवार रोजी तहसील कार्यालय घाटंजी येथे आर्णी- केळकर मतदार संघाचे लाडके आ.डॉक्टर संदीप धुर्वे यांच्या हस्ते अत्यंत गरीब महाराष्ट्र इमारत इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ यांच्या वतीने घाटंजी तालुक्यातील इमारत बांधकाम मजूर व कामगार बंधू व भगिनींना गृह उपयोगी वस्तू संच डिनर सेट वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी भारतीय जनता पार्टी चे घाटंजी तालुकाध्यक्ष डहाके सर, शहराध्यक्ष बालू उर्फ राम खांडरे, घाटंजी नगरीचे ठाणेदार सुरडकर साहेब,कृषी उत्पन्न बाजार समिती उपसभापती सचिन पारवेकर, माजी उपसभापती कृषी उत्पन्न बाजार समिती प्रकाश पाटील डंभारे, कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक. चंद्रकांत पाटील इंगळे, संजय गोडे, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष चेतन जाधव,तालुका सरचिटणीस अनुपभाऊ अप्पनवार, दिलीप पवार,महिला अध्यक्ष रीनाताई धनरे, सुषमाताई खांडरे, लताताई ठाकरे, अंकुश ठाकरे,अमित महल्ले,कंठेश्वर जी,प्रभाकर चटूले, गजानन महल्ले,प्रीतम हिवाळे, गिरीधर राठोड, घाटंजी येथील सामाजिक कार्यकर्ते तथा श्रमिक कामगार संघटनेचे तडफदार अध्यक्ष महेश ठाकरे, वसंतराव मोरे, प्रभाकर चटुले कणकेश्वर काका पदाधिकारी व बरेच कार्यकर्ते उपस्थित होते.











